woman's sensational allegation against veteran actor Darshan Jariwala  SAKAL
मनोरंजन

Darshan Jariwala: "मी गरोदर असून आमचं लग्न झालंय...", महिलेचा ज्येष्ठ अभिनेत्यावर खळबळजनक आरोप

६५ वर्षीय अभिनेत्यावर महिलेने गंभीर आरोप केलाय

Devendra Jadhav

Darshan Jariwala News: टीव्ही आणि चित्रपटांमध्ये आपल्या भूमिकांनी लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारे ६५ वर्षीय अभिनेते दर्शन जरीवाला अडचणीत आले आहेत. दर्शनवर एका महिलेने धक्कादायक आरोप केला आहे. "मी दर्शनच्या मुलाची आई होणार", अशी तक्रार महिलेने पोलिसांत दाखल केली आहे. महिलेच्या या दाव्यानंतर या प्रकरणावर दर्शन यांनीही समोर आले आहे.

आम्ही गांधर्व विवाह केला असून...

'गांधी, माय फादर'साठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या ६५ वर्षीय दर्शन जरीवाला यांच्यावर एका महिलेने खळबळजनक आरोप केले आहेत. या महिलेचा दावा आहे की, तिने अभिनेत्यासोबत गांधर्व विवाह केला आहे आणि आता ती त्याच्या मुलाची आई होणार आहे. याप्रकरणी महिलेने आता पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

मला स्वाभिमानासाठी लढायचे आहे

TOI च्या रिपोर्टनुसार, या महिलेचे म्हणणे आहे की, तिचे आणि दर्शन जरीवालाचे अनेक वर्षांपासून प्रेमाचे नाते आहे. या दोघांचा 'गांधर्व विवाह' झाला होता आणि आता ती आई होणार आहे. पण दर्शन जरीवाला आता तिला आणि न जन्मलेल्या मुलाला दत्तक घेण्यास स्पष्टपणे नकार देत आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार तिने CINTAA कडे मदत मागितली आहे आणि दर्शनला असोसिएशनमधील अधिकृत पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

याप्रकरणी महिलेने कोलकाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, तिला आता तिच्या सन्मानासाठी ही लढाई लढायची आहे. या संबंधित अनेक पुरावेही तिने पोलिसांसमोर सादर केले आहेत.

दर्शन जरीवाला कायदेशीर लढाई लढण्यास तयार

हे प्रकरण समोर आल्यानंतर दर्शन यांच्या वकिलाने अभिनेत्याच्या वतीने निवेदन दिले आहे. दर्शन जरीवालाची वकील सविना बेदी सच्चर म्हणाली की, "अभिनेता निर्दोष आहे. जोपर्यंत तो दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत दर्शन जरीवाला दोषी आहेत असं कोणीही गृहीत धरू नये", असे ते म्हणाले.

अभिनेत्याच्या बाजूने असा युक्तिवाद केला आहे की, "खोट्या आरोपांच्या आधारे लोकांना, विशेषतः सार्वजनिक व्यक्तींना दुखावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अभिनेता दर्शन कायदेशीर आधारावर लढण्यास तयार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT