मनोरंजन

पुरुषांच्या 'या' पाच गोष्टींवर जास्त लक्ष देतात महिला

वृत्तसंस्था

पुणे : तुम्ही कधीना कधी ऐकलं असेल की, पुरुष पहिल्या भेटीत महिलांच्या अनेक गोष्टींना नोटीस करतात. त्याचप्रकारे महिलाही पुरुषांच्या काही गोष्टी नोटीस करतात. तुमच्या बोलण्याच्या स्टाईलपासून ते तुमच्या कपड्यांच्या सेन्सपर्यंत त्या सगळंच नोटीस करतात. 

अशाच काही गोष्टी असतात ज्या मुलांच्या बाबतीत मुलींकडून सातत्याने नोटीस केल्या जातात.

पोट - सायंटिफिक जनरल सेक्सिऑलॉजीमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार ही बाब समोर आली आहे की, मुली मुलांच्या बायसेप्सआधी पोटावर आधी लक्ष देतात. जर तुमचं पोट निघालेलं नसेल तर महिला तुमच्याकडे अधिक आकर्षित होतात. म्हणजेच मुलांना पोट आलेले मुलींना आवडत नाही.

2) केस आणि दाढी - अनेकदा महिला या पुरुषांचे केस आणि दाढी नोटीस करतात. हा तुमच्या शरीरातील सर्वात वरचा भाग असतो आणि यावर आधी लक्ष जाणं स्वाभाविक आहे. पण महिलांना विस्कटलेले आणि घाणेरडे केस अजिबात आवडत नाही. पुरुषांच्या डोक्यावर शेंडी असणेही काही महिलांना पसंत नसतं. तर सध्या मुलाला दाढी असणे हे मुली अधिक पसंद करत असल्याचे समोर आले आहे.  

3) लांब पाय - यूनिव्हर्सिटी ऑफ कॅंब्रिजमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून निष्कर्ष काढण्यात आला की, महिलांना पुरुषांचे लांब पाय अधिक आकर्षित करतात. या ऑनलाईन सर्व्हेमध्ये अमेरिकेतील 800 महिलांनी लांब पाय असलेल्या पुरुषांमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला असल्याचे समोर आले आहे. 

4) बॉडी लॅंग्वेज - मुलींचं या गोष्टीवर अधिक लक्ष असतं. तुम्ही कसे उभे राहता, तुमचं उठणं-बसणं कसं आहे. याकडे त्यांचं लक्ष असतं. कारण यातून तुमचा आत्मविश्वास दिसून येतो. मुलींना आत्मविश्वासू लोक अधिक पसंत असतात.

5) हात आणि नखं - महिला या तुमचे हात आणि नखंही नोटीस करतात. त्यांना घाणेरडे हात आणि नखं अजिबात आवडत नाही. त्यांना मुलांनी वाढवलेली नखेही पसंत पडत नसल्याचे निरिक्षण समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT