Women Asia Cup 2022: esakal
मनोरंजन

Women Asia Cup 2022: मोक्कार आनंद! पाकला लोळवल्यानंतर लंकेच्या मैदानात उड्या

महिला आशिया कप स्पर्धेतील रंगत आता वाढली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये श्रीलंकन संघानं पाकिस्तानच्या संघाला पराभवाची धुळ चारली.

सकाळ डिजिटल टीम

Women Asia Cup 2022: महिला आशिया कप स्पर्धेतील रंगत आता वाढली आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये श्रीलंकन संघानं पाकिस्तानच्या संघाला पराभवाची धुळ चारली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. आपण आता फायनला पोहचलो आहोत याचा आनंद श्रीलंकन टीमनं ज्याप्रकारे साजरा केला आहे त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात श्रीलंकन महिला टीम नाचून आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहे.

आता श्रीलंकेची फायनल 15 ऑक्टोबरला आहे. त्यांची लढत भारतीय संघाशी होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे. एकीकडे सोशल मीडियावर फायनलमध्ये जाण्याचा आनंद श्रीलंकन टीम साजरा करत असली तरी दुसरीकडे भारतीय संघाशी त्यांची होणारी लढत आव्हानात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मोठ्या गंमतीशीर आहेत. त्यात एकानं लई नाचू का, फायनल भारतासोबत असल्याचे सांगून श्रीलंकन टीमला सावध केले आहे.

श्रीलंका महिला संघाची कॅप्टन चमारी अट्टापट्टूनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. श्रीलंकन टीमनं 122 धावांचे लक्ष्य पाकिस्तानसमोर ठेवले होते. मात्र पाकिस्ताननं हलक्यात घेऊन अतिआत्मविश्वासाच्या नादात हा सामना गमावल्याचे दिसुन आले. अवघ्या एका धावेनं श्रीलंकन टीमचा विजय झाला. त्यामुळे हा पराभव पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT