World Cup 2023 IND vs Aus Anushka Sharma getting emotional after Indias defeat  SAKAL
मनोरंजन

IND vs AUS 2023 Final: भारताच्या पराभवानंतर अनुष्का शर्माचेही डोळे पाणावले

भारताचा आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकप सामन्यात पराभव झाला

Devendra Jadhav

Anushka Sharma at Worldcup Final: भारताने आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकप सामना गमावला. भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाने सर्व भारतीयांना नक्कीच वाईट असेल. भारताने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकही सामना गमावला नव्हता. आणि वर्ल्डकप फायनलमध्ये भारताला पराभव पत्करावा लागल्याने सर्वांनाच दुःख झालंय.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये प्रत्येक मॅचला क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा टीमला सपोर्ट करायला उपस्थित होती. पण भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवामुळे अनुष्का सुद्धा दुःखी झालेली दिसली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. लाखो भारतीयांप्रमाणेच अभिनेत्री अनुष्का शर्मा, अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटूंच्या कुटुंबातील इतर सदस्यही स्टेडियममध्ये भावूक होताना दिसले.

सामना संपल्यावर अनुष्का भावूक झालेली दिसली. अनुष्का शांतपणे मैदानात बघत होती. समस्त भारतीयांप्रमाणे अनुष्काही तिचं दुःख लपवू शकत नव्हती. याशिवाय रोहितची पत्नी रितिकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. केएल राहुलची पत्नी, अभिनेत्री अथिया शेट्टीसुद्धा भावूक झालेली दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT