World Cup 2023 Shah Rukh Khan Trophy photo Viral  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan Birthday: 'चक दे इंडिया'! किंग खानच्या हातात ट्रॉफी, यावर्षी भारत वर्ल्ड कप जिंकणारच!

शाहरुखच्या त्या फोटोनं सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

युगंधर ताजणे

World Cup 2023 Shah Rukh Khan Trophy photo : आज बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा वाढदिवस. शाहरुख काही दिवसांपुर्वी त्याच्या एका फोटोमुळे भलताच चर्चेत आला आहे. तो फोटो आहे यंदाच्या वर्ल्ड कपचा. यावर्षी भारतात वर्ल्ड कप थरार रंगणार आहे. पाच ऑक्टोबरपासून या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. यात भारताचा पहिला सामना आठ ऑक्टोबरला होणार असून हायव्होल्टेज सामना भारत Vs पाकिस्तान पंधरा ऑक्टोबरला होणार आहे.

यासगळ्यात गेल्या काही दिवसांपासून आयसीसीनं वेगवेगळ्या प्रकारे वर्ल्ड कपसाठी वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. अशात बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या त्या फोटोनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. काहींनी तर शाहरुख हा आता वर्ल्ड कपचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे का असा प्रश्नही आयसीसीला केला आहे. आय़सीसीनं त्यांच्या अधिकृत ट्विटवरुन शाहरुखचा हातात वर्ल्ड कप असलेला फोटो शेयर केला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

तुम्ही किंग खानला आयसीसी २०२३ ट्रॉफी हातात उंचावलेली दिसते आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. अशा शब्दांत किंग खानचा गौरव केला आहे. यापूर्वी कोणत्याही बॉलीवूडच्या अभिनेत्यानं वर्ल्ड कप पूर्वी ती ट्रॉफीसोबत फोटो शेयर केलेला नाही. त्यामुळे यावेळी आय़सीसीनं शाहरुख सोबत तो फोटो शेयर करणे सगळ्यांसाठी आश्चर्याची बाब मानली जात आहे.

दुसरीकडे शाहरुखच्या त्या फोटोवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. किंग खाननं ट्रॉफीला हात लावला म्हणजे आता आपण विजयी होणारच. अशा आशयाच्या प्रतिक्रिया त्या ट्विटवरुन व्हायरल होताना दिसत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड असा होणार असून भारतामध्ये वर्ल्डची वातावरण निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्याच वेळी संपूर्ण स्पर्धा एकूण 10 ठिकाणी खेळवली जाणार आहे. मेगा इव्हेंटमध्ये एकूण 48 सामने होणार आहेत, जे 46 दिवसांत खेळवले जातील. अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, धर्मशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे शहरांचा समावेश आहे. तर हैदराबादसह गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये सराव सामने खेळवले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT