kangana ranaut (3) 
मनोरंजन

कंगना पुन्हा वादात; फसवणुकीचा गुन्हा दाखल

स्वाती वेमूल

अभिनेत्री कंगना राणावतसह इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाच्या आगामी 'मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजंट ऑफ दिद्दा' या चित्रपटावरून नवीन वाद सुरू झाला आहे. लेखक आशिष कौल यांनी कंगनाविरोधात फसवणूक आणि कॉपीराइट्सच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. 'Didda: The Warrior Queen' या चरित्र पुस्तकाचे हक्क फक्त आपल्याकडे असून कंगनाने त्यातील कथा चित्रपटासाठी चोरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २०१९ मध्ये कंगनाचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने त्याच्या सीक्वेलची घोषणा केली. आता कंगनासोबत तिची बहीण आणि मॅनेजर रंगोली चांडेल आणि निर्माते कमल जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांविरोधात मुंबई पोलिसांनी विश्वासघात करणे, फसवणूक करणे आणि कॉपीराइट नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल झाला आहे. 

दिद्दा : द वॉरिअर क्वीन ऑफ काश्मीरचे लेखक आशिष कौल यांनी त्यांच्या पुस्तकाची कथा काही दिवसांपूर्वी कंगनाला ईमेलवरून पाठवली होती. त्याच्या काही दिवसांनंतरच कंगनाने त्याच कथेवर आधारित चित्रपटाची घोषणा केली. मात्र चित्रपटाची घोषणा करताना कंगनाने मूळ लेखकांची परवानगी घेतली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली. कंगनाने याच वर्षी जानेवारी महिन्यात चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर कौल यांनी वांद्रे इथल्या महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने सर्व बाबींची पडताळणी करून मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कंगनासोबत इतर दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT