मनोरंजन

‘छपाक’ चित्रपटाचे विघ्न टळेना! काय आहे अडचण! वाचा संपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या आणि नव्याने आयुष्याला सामोरे गेलेल्या युवतीची कहाणी सांगणारा ‘छपाक’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. लेखक राकेश भारती यांनी या चित्रपटाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.

रंग माझा वेगळा मधील दीपा पहा प्रत्यक्षात कशी दिसते

ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या लक्ष्मी आगरवाल या तरुणीची कथा सांगणाऱ्या ‘छपाक’ चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण हिने लक्ष्मी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. फॉक्‍स स्टार स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित 
होणार आहे. 

या चित्रपटाची मूळ संकल्पना आणि कथा आपली असून, त्याबाबत इंडियन मोशन पिक्‍चर्स असोसिएशनकडे (इंपा) नोंदणी केल्याचा दावा राकेश भारती यांनी केला आहे. ‘ब्लॅक डे’ या नावाने फेब्रुवारी २०१५ मध्ये नोंदणी केली होती, असे त्यांनी दाव्यात म्हटले आहे. आवश्‍यकता वाटल्यास ‘छपाक’ चित्रपटाची पटकथा आणि आपण लिहिलेली पटकथा तज्ज्ञांकडून तपासावी, असे याचिकादार राकेश भारती यांनी सुचवले आहे. ॲड्‌. अशोक सरोगी यांच्यामार्फत केलेल्या या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयात २७ डिसेंबरला सुनावणी होईल. 

‘निर्मात्यांकडून दाद नाही’
या पटकथेवर चित्रपट येत आहे असे समजल्यावर फॉक्‍स स्टार स्टुडिओकडे तक्रार केली; मात्र दाद न दिल्यामुळे उच्च न्यायालयात दावा दाखल केला, असे भारती यांनी सांगितले. निर्मात्यांनी श्रेयनामावलीत लेखक म्हणून आपलाही समावेश करावा; अन्यथा ‘छपाक’ च्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

Nashik IVF Centers : स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून १२ आयव्हीएफ सेंटर्सची तपासणी पूर्ण

Konkan Project : पोयनार, न्यू मांडवे धरणांना मान्यता; मंत्री कदम, पोयनारला २६५, न्यू मांडवेला १९५ कोटी

Nashik Municipal Corporation : नाशिकच्या २४ खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार! महापालिका अंदाजपत्रकात 'खेडे विकास निधी'ची तरतूद

'यापेक्षा पॉर्न बरं असतं' नोरा फतेहीच्या गाण्यावर भडकले नेटकरी, म्हणाले...'शब्द असे की...'

SCROLL FOR NEXT