mumbai images 
मनोरंजन

महिलांवरील कथांची फार वानवा आणि दुर्भिक्ष्य आहे, मर्दानी सिनेमाला सहा वर्ष पूर्ण -  दिग्दर्शक गोपी पुथरन

संतोष भिंगार्डे

मुंबई : आपल्याकडे विविध विषयांवरील चित्रपट येतात आणि त्यांचे स्वागत केले जाते. परंतु महिलाप्रधान कथांवरील चित्रपटांची संख्या खूप कमी आहे. विशेष म्हणजे जिगरबाज आणि साहसी महिला पोलिस अधिकाऱ्यांवर चित्रपट खूप कमी येत आहेत, असे दिग्दर्शक गोपी पुथरन म्हणाले.

लेखक आणि दिग्दर्शक गोपी पुथरन यांचा सिनेसृष्टीतील प्रवास फारच रंजक आहे. लफंगे परिंदेचा लेखक म्हणून त्यांनी यशराज फिल्ममध्ये  प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मर्दानीसाठी लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि मर्दानी 2 मध्ये दिग्दर्शनाची धुराच त्यांनी सांभाळली. गेली 10 वर्षे गोपी आदित्य चोप्रा यांच्यासोबत काम करत आहेत. आता मर्दानी सिनेमाला सहा वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ते बोलत होते.

गोपी म्हणाले, 'मर्दानी सिनेमांची मांडणी आम्ही वेगळ्या पद्धतीने केली. मला असं वाटतं. पहिल्या आणि दुसऱ्या भागात आम्ही जी संकल्पना मांडली त्यातून महिलांना सतत आपले अस्तित्व सिद्ध करण्याची करावी लागणारी धडपड दिसून येते. जिथे सतत स्त्रियांना तडजोड करण्यास सांगितले जाते अशा समाजात स्वत:ला सिद्ध करण्याचा हा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे मांडला आहे.'

गोपी पुढे म्हणाले, 'मला वाटतं हाच मुद्दा महत्त्वाचा ठरला आणि प्रेक्षकांना त्याच्याशी जोडून घेता आलं. मला वाटतं, या विचाराशी ठाम राहणं आणि महिलांना भेडसावणाऱ्या समस्या हाताळणं प्रेक्षकांना भावलं आणि यापुढेही या संकल्पनांवर आम्ही पुढील भाग काढू आणि त्यातही आजवर आम्ही ज्या पद्धतीने हे हाताळालं तसाच न्याय कथांना देऊ, अशी मला आशा आहे.'

2020 मध्ये गोपी यांच्या वायआरएफमधील कारकिर्दीला 10 वर्षे पूर्ण झाली. हा प्रवास त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. गोपी म्हणतात, 'या खऱ्या अर्थाने फार कर्माच्या वगैरे गोष्टी वाटतात. वायआरएफसोबत माझं काही तरी नातं आहे, विशेषत: आदित्य चोप्रांसोबत काही तरी बंध आहेत. अगदी पहिल्या भेटीपासून आम्ही सहजतेने सर्जनशील पद्धतीने जोडले गेलो. मी त्यांच्याशी माझा मुद्दा घेऊन अगदी सहज वाद घालू शकतो. मी अगदी नवा होतो, तेव्हाही माझं म्हणणं मोकळेपणाने सांगू शकत होतो आणि हीच आदी आणि वायआरएफसोबत असलेल्या नात्यात महत्त्वाची बाब आहे. राणीसोबतही गोपी यांचे अप्रतिम नाते आहे.

मर्दानी मालिकेतून त्यांनी राणीला रुपेरी पडद्यावर अप्रतिम चित्रित केले आहे. गोपी म्हणाले, 'राणीने शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत आपले प्राण ओतले आहेत. तिने ज्या पद्धतीने या पात्राला गहिरेपणाने समजून ते साकारले आहे, हे पाहणे फार समाधानकारक आहे. विशेषत: लेखकासाठी हे फारच आनंदाचे असते जेव्हा एखादा स्टार कलाकार इतक्या मेहनतीने आणि मनापासून प्रयत्न करत असतो. तिने शिवानी शिवाजी रॉयला जिवंत केलं आहे.'

गोपी यांच्या मते राणी साहसदृश्ये फार सहजतेने आणि नैसर्गिक करते. ती ऍक्शन दृश्यांमध्ये भन्नाट दिसते. मर्दानी 1 आणि मर्दानी 2 यामध्ये राणी सर्वच ऍक्शन दृश्यांमध्ये फार नैसर्गिक वाटली आहे. असं वाटतं की, ती याच भूमिकेसाठीच बनली आहे. म्हणूनच हे सिनेमे पाहणं समाधानकारक वाटतं. ती त्यातील अस्वस्थता दाखवू शकते आणि त्याचवेळी ती या व्यक्तीरेखेचा खंबीरपणाही दाखवू शकते. म्हणूनच आजवर भारतीय सिनेमांमध्ये पाहिलेल्या व्यक्तिरेखांच्या तुलनेत शिवानी फार वेगळी ठरते. याचं संपूर्ण श्रेय राणीला, तिच्या क्षमतांना आणि तिच्या बुद्धिमत्तेला जातं, असं गोपी म्हणाले.

लफंगे परिंदेचे लेखक ते बॉलिवुडमधील आजघडीचे सर्वात लोकप्रिय दिग्दर्शक असा गोपी यांचा प्रवास आहे. ते म्हणतात, "दादा (प्रदीप सरकार) यांचा यात मोठा वाटा आहे. त्यांनीच मला सांगितलं की तू यात (लफंगे परिंदे बनवण्यात) सहभागी हो. आम्ही दोघं लफंगे परिंदेपासून मर्दानी 1 साठी एकत्र आलो आणि त्यातूनच मी या दोन्ही सिनेमांचा सहाय्यक दिग्दर्शक बनलो. मला नेहमीच दिग्दर्शक बनायचं होतं. असे काही लेखक असतात ज्यांना माहीत असतं ते लेखन आणि दिग्दर्शन एकत्र करू शकतात आणि मी त्यापैकी एक आहे. मी फक्त योग्य सिनेमा समोर येण्याची वाट पाहत होतो."

ते पुढे म्हणाले, "मी हे आदिसोबत बोलत असताना आम्ही अनेक सिनेमांची चर्चा केली, ज्याचं दिग्दर्शन मी करू शकेन. त्यानेच सुचवलं की तू मर्दानीचा सिक्वेल का करत नाहीस, तुला तर ते सगळं जग माहीत आहे. हा सिनेमा योग्य पद्धतीने हाताळणं तुझ्यासाठी तुलनेन सोपं असेल. तुझं राणीसोबतही चांगलं जमतं. हा तुझा पदार्पणाचा सिनेमा ठरेल. मी अगदी मनापासून सहमत होतो आणि अशा रितीने मी ही जबाबदारी घेतली."

संपादन -  सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT