Yami Gautam Google
मनोरंजन

'फेस ऑफ द फेअरनेस क्रीम' यामी गौतम झुंजतेय या गंभीर त्वचारोगाशी...

तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत दिली आजाराविषयी माहिती

प्रणाली मोरे

यामी गौतम(Yami Gautam) म्हणजे फेअरनेस क्रीमवर सर्वसामान्य मुलींना भाळायला लावणारा आश्वासक चेहरा. दिसायला गोरीपान,सुंदर अशा या मुलीनं आज जगभरातल्या मुलींना फेअरनेस क्रीम वापरण्यास भाग पाडलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सिनेमांमध्ये यायच्या आधीपासनं यामी त्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीचा चेहरा होती आणि तिथेच तिला खरी प्रसिद्धी मिळाली. पण त्या जाहिरातीतनंच तिच्यातील आत्मविश्वासाची आणि अभिनयाची चमक दिसली आणि तिला बॉलीवूडची दारं खुली झाली. केवळ सिनेमांचा प्रेक्षकवर्ग नाही तर सोशल मीडियावरही तिचा असा स्वतःचा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच तिथेही चर्चेत असते. पण आता तिनं असं काही सोशल मीडियावर पोस्ट केलंय की त्यामुळे एका वेगळ्याच चर्चेला पेव फुटलंय. तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधनं स्वतःला झालेल्या एका गंभीर त्वचारोगाची माहिती दिलीय.

त्या पोस्टमधनं तिला होणारा त्रास उघडपणे समोर आलाय. तिनंही एक अभिनेत्री,पब्लिक फीगर असताना काहीही लवपून नं ठेवता सगळं खरं-खरं सांगितलं आहे. तिला 'केराटोसिस पिलारिस' नावाचा गंभीर त्वचारोग झाला आहे. मागच्या अनेक वर्षांपासनं ती या आजाराचा सामना करीत आहे. यामी म्हणाली,''या आजाराविषयी जाणून घेण्यापासून ते सोशल मीडियावर याबाबत उघडपणे व्यक्त होण्यापर्यंतचा प्रवास बराच आव्हानात्मक होता. जेव्हा लोक शूटिंगच्या वेळी पहायचे तेव्हा ते हे सर्व कसं लपवता येऊ शकतं याबाबत मला सल्ला द्यायचे. हे सर्व जसं आहे तसं स्वीकारण्यासाठी मला अनेक वर्ष लागली. पण आता सर्वांसमोर उघडपणे याबाबत बोलल्यावर आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मला खूप मोकळं वाटत आहे''.

तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की,''मी एक फोटोशूट केलं होतं आणि त्यानंतर ते फोटो एडिटिंगसाठी जाणार होते. जेणेकरून माझ्या त्वचेवरील फ्लॉज झाकले जातील. तेव्हा मी ठरवलं मी आता माझ्या त्वचेच्या या समस्येला स्विकारायला हवं. अगदी तरुण वयापासनं मी या समस्येचा सामना करीत आहे. यावर कोणाताही उपचार नाही. त्यामुळे हे सर्व जसं आहे तसं स्विकारणं योग्य आहे. त्वचेच्या या समस्येत त्वचेवर दाणे येतात आणि विश्वास ठेवा तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावता एवढं हे त्रासदायक असतं. मी अनेक वर्ष हे सहन करत आहे. पण आता मी आहे तसं सकळं स्विकारायचं ठरवलं आहे." यामीनं काही महिन्यापूर्वीच फिल्ममेकर आदित्य धरशी लग्न केले आहे. अत्यंत पारंपरिक पण साध्या पद्धतीनं तिनं लग्न केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT