yash chopra news esakal
मनोरंजन

Mumtaz: 'मुमताज आणि यश चोप्रा यांचं...' पत्नी पामेलाचा गौप्यस्फोट

यश चोप्रा हे बॉलीवूडमधील मोठं नावं आहे. निर्मिती क्षेत्रामध्ये त्यांनी अमाप लोकप्रियता मिळवली आहे. हिंदी चित्रपट (Bollywood movies) इंडस्ट्रीमध्ये त्यांनी स्वताच्या नावाची ओळख निर्माण केली आहे.

युगंधर ताजणे

Yash Chopra Love Story News: यश चोप्रा हे बॉलीवूडमधील मोठं नावं आहे. निर्मिती क्षेत्रामध्ये त्यांनी अमाप लोकप्रियता मिळवली आहे. हिंदी चित्रपट (Bollywood movies) इंडस्ट्रीमध्ये त्यांनी स्वताच्या नावाची ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्यांना घेऊन त्यांनी चित्रपट निर्मिती केली आहे. चांदणी, दिल तो पागल है, वीर झारा आणि दीवार सारख्या चित्रपटांची (Bollywood news) निर्मिती त्यांनी केली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आजही ते चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जातात. यश चोप्रा हे सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे. त्यांच्या पत्नीनं पामेला यांनी वेगळा खुलासा केला आहे.

पामेला यांनी यश चोप्रा यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांनी त्यांच्या अनेक माहिती नसलेल्या गोष्टींबद्दल गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे यश चोप्रा हे चर्चेत आले आहेत. त्या गोष्टींविषयी यश चोप्रा यांच्या चाहत्यांना फारशी माहिती नाही. पामेला यांनी प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज आणि यश चोप्रा यांचे अफेयर असल्याचे सांगितले आहे. एका मुलाखतीमध्ये पामेला यांनी हसता हसता त्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली होती. ते दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. ते लग्न देखील करणार होते. मात्र अभिनेत्रीच्या घरच्यांना ते लग्न मान्य नव्हते. असेही पामेला यांनी सांगितले.

यश चोप्रा यांच्या आयुष्यातील सिक्रेट्स पामेला यांनी रेडिफला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. माझी आणि यश यांची मुलाखत दिल्लीतील स्टार क्रिकेट शोमध्ये झाली होती. यशजींच्या भाचीच्या लग्नात आमची पुन्हा ओळख झाली. त्यावेळी आम्ही एकमेकांशी बोललो. मी अशा कुटूंबातून आले होते. तिथे शिस्तीला फार महत्व होते. यश यांच्याशी लग्न झाल्यानंतर मला चित्रपट, म्युझिक या साऱ्या गोष्टींविषयी कळाले, तोपर्यत मी फार अनभिज्ञ होते. भलेही यश चोप्रा यांनी अनेक रोमँटिक चित्रपट तयार केले असतील पण ते देखील एका अभिनेत्रीच्या आकंठ प्रेमात होते.

रियल लाईफमध्ये ते खूप प्रॅक्टिकल होते. त्यांचे बरेचशे चित्रपट हे स्वित्झर्लंडला शुट झाले आहेत. याचे खास कारण त्यांना ठिकाणी शुटिंगसाठीच्या परवानग्या मिळण्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नसत. यश चोप्रा यांनी बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना घेऊन काम केले. मात्र त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात कधीही मतभेद झाले नाही. आमच्यादृष्टीनं कुटूंबाला प्राधान्य देणे सर्वात महत्वाचे होते. जे आम्ही नेहमीच पाळले. एकमेकांबद्दल आदरही ठेवला. आमच्या लग्नापूर्वी त्यांच्याविषयी एक चर्चा होत असे. ती म्हणजे एका प्रसिद्ध अभिनेत्री सोबत यश यांचे प्रेमसंबंध होते.

मी यश यांचे मित्र रोमेश यांना त्याविषयी विचारणा केली होती. यश आणि मुमताज यांच्याविषयी ऐकले ते खरे का, असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यांनी सांगितले की, ते चांगले मित्र आहेत. बाकी काही नाही. पण पामेला यांना त्या उत्तरावर विश्वास बसला नाही. त्यांना माहिती होते की, तो मित्र जे काही सांगत आहे ते खोटे आहे. मुमताज आणि यश यांनी 1969 मध्ये आदमी और इन्सानमध्ये एकत्र काम केले होते. असं सांगितलं जातं की, यशजी हे मुमताजचींच्या प्रेमात वेडे झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडे तरुणांची गर्दी; ५०० इच्छुकांच्या मुलाखती!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन हद्दीत खुनाची घटना; संशयिताच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना!

Sinhagad Fort Exhibition : सिंहगडावर शिवकालीन वैभवाचा जागर; ९९ दुर्ग प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन!

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

SCROLL FOR NEXT