yash actor  Team esakal
मनोरंजन

KGF Yash : 'रावणाची भूमिका करशील?' केजीएफचा रॉकी भाई म्हणाला, मला...

टॉलीवूडचा स्टार अभिनेता यश हा त्याच्या केजीएफमुळे चर्चेत आला होता. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं.

सकाळ डिजिटल टीम

Yash Kgf 2 star actor now will be seen Ramayana Movie Hrithik : टॉलीवूडचा स्टार अभिनेता यश हा त्याच्या केजीएफमुळे चर्चेत आला होता. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं. बॉलीवूडच्या चित्रपटांना दणका देणाऱ्या केजीएफच्या यशची वेगळी बातमी आता समोर आली आहे. तो बॉलीवूडच्या बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.

ह्रतिक बॉलीवूडचा सर्वाधिक लोकप्रिय असणारा चेहरा आहे. त्याच्या लूक्स आणि डान्सची चर्चा होत असते. ह्रतिक हा गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या बिग बजेट चित्रपटाच्या शोधात आहे. त्याच्या विक्रम वेधा चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक नितेश तिवारी आणि मधु घंटेना हे रामायणावर आधारित चित्रपटाची निर्मिती कऱणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Also Read - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

दुसरीकडे कन्नड अभिनेता यश हा त्याच्या प्रभावी भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. त्याच्या केजीएफला मिळालेला प्रतिसादच सर्व काही सांगून जातो. आता तो रामाय़णावर आधारित चित्रपटामध्ये चक्क रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. त्याच्या अगोदर ही भूमिका ह्रतिक करणार असल्याची चर्चा होती. आता दोघांपैकी कुणाच्या वाट्याला ही भूमिका येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

२०२२ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून केजीएफचे नाव घेता येईल. त्याच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. निर्मात्यांनी त्या भूमिकेसाठी यशला विचारणा केल्याचे सांगितले जात आहे. यशनं देखील आपल्याला ही भूमिका करण्यास आपल्याला आवडेल असे सांगितल्याची चर्चा आहे. यश सध्या वेगवेगळया स्क्रिप्ट ऐकण्यात व्यस्त असल्याची माहिती आहे.

असंही म्हटलं जातंय की, यश हा त्या रामायणावर आधारित चित्रपटाच्या प्री व्हिज्युलायझेशनवर खुश आहे. त्यामुळे त्याला जेव्हा त्या भूमिकेसाठी विचारल्यानंतर दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. या चित्रपटामध्ये भगवान राम यांच्या भूमिकेत रणबीर कपूरचे नाव आहे. यशच्या आगामी वर्कफ्रंट विषयी सांगायचे झाल्यास त्याच्या केजीएफ या चित्रपटाचे पाच भाग येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT