Yash Raj Films esakal
मनोरंजन

Yash Raj Films: कलाकारांसाठी सुवर्ण संधी, यशराजनं काढलं स्वत:चं कास्टिंग अ‍ॅप; 'हे' कारण देत घेतला मोठा निर्णय

Yash Raj Films: यशराज फिल्म्सनं YRF कास्टिंग ॲप लॉन्च केले आहे, ज्याचा वापर जगभरातील A golden opportunity for artists, Yash Raj launched his own casting app; A big decision was taken by giving 'this' reason | कलाकार कास्टिंग कॉलची माहिती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या ऑडिशन सबमिट करण्यासाठी करू शकतात.

priyanka kulkarni

Yash Raj Films: यशराज फिल्म्स ही भारतातील आघाडीची मीडिया कंपनी आहे. यशराज फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसनं नुकतेच YRF कास्टिंग ॲप लॉन्च केले आहे, ज्याचा वापर जगभरातील कलाकार कास्टिंग कॉलची माहिती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या ऑडिशन सबमिट करण्यासाठी करू शकतात. जाणून घेऊयात अॅपबद्दल...

YRF कास्टिंग ॲपमध्ये कलाकार त्यांचे प्रोफाइल बनवू शकतात. तसेच या अॅपवर कलाकार त्यांचे ऑडिशन अपलोड करु शकतात.

यशराज फिल्म्स हे अॅप लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे कारण बनावट YRF कास्टिंग अकाऊंट्समुळे उद्भवलेल्या समस्या या YRF अॅपमुळे कमी होती. बनावट कास्टिंग कॉल्समुळे बऱ्याच वेळा कलाकारांची दिशाभूल होते. YRF अॅपमुळे कलाकार त्यांचे ऑडिशन आता थेट अॅपवर अपलोड करु शकतात.

YRF कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा ही YRF प्रोजेक्ट्समध्ये लीड म्हणून लॉन्च करण्यात येणाऱ्या लोकांची निवड करणे आणि त्यांचे प्रशिक्षण घेणे याचं काम करेत. शानू ही ॲपद्वारे येणाऱ्या सर्व ऑडिशन्सचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करणार आहे. शानू शर्माने “एक था टायगर,” “गुंडे,” “सुलतान,” “टायगर 3,” “पठान”, “हिचकी,” “दम लगा के हैशा,” “मर्दानी” यासारख्या YRFच्या हिट चित्रपटांच्या टीममध्ये काम केलं आहे.

शानू शर्मानं सांगितलं, "YRF कास्टिंग ॲप हे इच्छुक कलाकारांना कंपनीद्वारे निर्मित प्रकल्पांसाठी थेट प्रवेश देण्याच्या दिशेने एक प्रगतीशील पाऊल आहे. जगभरात असंख्य प्रतिभावान कलाकार शोधणे या अॅपमधून शक्य होणार आहे.या अॅपच्या माध्यमातून प्रथमच, एक महत्त्वाकांक्षी कलाकार थेट प्रॉडक्शन हाऊसशी संपर्क साधू शकतो. हे एक सुरक्षित ठिकाण आहे. ज्या कलाकारांना त्यांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत, त्यांना आता इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT