yashpal sharma news  Team esakal
मनोरंजन

'मी तयार होतो 20 हजारात काम करायला, प्रत्यक्षात मिळाले 2 लाख'

अजूनही त्या चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) जे सर्वोत्तम चित्रपट (best movie) तयार झाले आहेत त्यापैकी एक म्हणजे लगान. या चित्रपटानं बॉलीवूडमध्ये इतिहास निर्माण केला होता. जागतिक पातळीवरही त्याचा गौरव झाला होता. ऑस्करच्या (oscar) शर्यतीत या चित्रपटानं मजल मारली होती. मात्र त्यावेळी लगानला मिळणारा ऑस्कर नो मॅन्स लँडला मिळाला होता. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांच्या वाट्याला निराशा आली होती. मात्र या कारणामुळे लगानचे महत्व काही कमी होत नाही. अजूनही त्या चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. (yashpal sharma said in interview I was ready to do the film for Rs 20000 but got Rs 2 lakh)

आमिर खान (aamir khan) निर्मित आणि आशुतोष गोवारिकर (ashutosh govarikar) लिखित, दिग्दर्शित लगानमध्ये कलाकारांची मोठी फळी होती. इंग्रजी अभिनेत्यांचाही यात मोठ्या प्रमाणावर भरणा होता. लगानच्या निर्मितीचा प्रवास चले चलो या माहितीपटामुळे प्रेक्षकांना माहिती आहे. आज लगान या चित्रपटानं वीस वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्तानं त्या चित्रपटातील अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. लगानमध्ये लाखाची भूमिका करणा-या यशपाल शर्मानं शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

यशपाल शर्मा यांनी म्हटले आहे, लगानमध्ये माझ्या वाट्याला लाखाची भूमिका आली होती. ती मी करण्यास उत्साही होती. त्यावेळी माझ्याकडे आणखी कुठल्या चित्रपटाच्या ऑफर्सही नव्हत्या. म्हणून मी वीस हजार रुपये मानधन घेऊन ही फिल्म केली होती. लगानचा प्रवास, तो अनुभव काही औरच होता. प्रत्यक्षात मला या चित्रपटाचे दोन लाख मिळाले होते. त्यामुळे मला नवल वाटले होते. अर्थात आनंदही झाला होता. यशपाल यांच्या या अनुभवाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

शर्मा म्हणाले, मला लाखा सोडून दुसरं कुठलंही पात्र करायचं नव्हतं. या चित्रपटामध्ये भुवन आणि कॅप्टन रसेल असे दोन पात्र आहेत. मात्र ती पात्रं आमीर आणि पॉलनं केली होती. माझ्या वाट्याला लाखाची भूमिका यावी असे वाटत होते. असं शर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT