Yed Lagla Premach Esakal
मनोरंजन

Yed Lagla Premach: पंढरपुरच्या राया आणि मंजिरीची हटके प्रेमकहाणी; 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा प्रोमो पाहिलात?

Yed Lagla Premach: विशाल निकम आणि पुजा बिरारी या दोघांच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

priyanka kulkarni

Yed Lagla Premach: घरोघरी मातीच्या चुली (Gharoghari Matichya Chuli) आणि साधी माणसं (Sadhi Manse) नंतर स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं (Yed Lagla Premach). माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. येड लागलं प्रेमाचं ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असेल. विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका. दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम आणि स्वाभिमान मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुजा बिरारी या मालिकेत राया आणि मंजिरीची भूमिका साकारताना दिसतील.

येड लागलं प्रेमाचं या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘येड लागलं प्रेमाचं ही मालिका प्रेमामुळे बदलत जाणारी माणसं आणि मानसिक स्थिती यावर भर देत हळुवार भावना उलगडत पुढे जाणारी आहे. प्रेक्षकांना मालिकेत भव्यदिव्य सीक्वेन्स बघायला मिळतील आणि करमणूक प्रधान कथा पुढे सरकत जाईल.’

विशाल निकमचं हटके पात्र

राया या पात्राविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणाला, ‘स्टार प्रवाह माझं कुटुंब आहे. या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होतोय याचा खूप आनंद आहे. मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखिल पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. पुजा बिरारीसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे. पुजा खूप समजूतदार आहे. ती स्वत:पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते. माणूस म्हणून ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पुजाच्या याच स्वभावामुळे आमचे सीन्स खूप छान होत आहेत अशी भावना विशाल निकम याने व्यक्त केली.’

मालिकेतील भूमिकेबद्दल काय म्हणाली पुजा बिरारी?

पुजा बिरारी देखिल मंजिरी हे पात्र साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. मंजिरी या नावातच गोडवा आहे. हाच गोडवा या पात्रात देखिल आहे. विठुराया तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. ‘शुटिंगच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच पंढरपुरात गेले. पण पहिल्यांदा गेलेय असं जाणवलं नाही. पंढरपुराने मला आपलसं केलं आहे असं मला वाटत होतं. पंढरपुरातल्या प्रत्येक गोष्टीत विठुरायाचा वास आहे. शुटिंगच्या निमित्ताने ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. याआधीच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम यापुढेही मिळेल याची मला खात्री आहे अशी भावना पुजा बिरारीने व्यक्त केली.’

पाहा ‘येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा प्रोमो:

विशाल निकम आणि पूजा बिरारीसोबतच मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार भेटीला येतील. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका येड लागलं प्रेमाचं लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT