karan mehra 
मनोरंजन

पत्नीच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेला करण डॉमिनॉज'मध्ये करायचा काम

'ये रिश्ता..' फेम करण मेहराला झाली होती अटक

स्वाती वेमूल

'ये रिश्ता क्या कहलाता है' Yeh Rishta Kya Kehlata Hai या मालिकेत नैतिकची भूमिका साकारत अभिनेता करण मेहरा Karan Mehra घराघरात पोहोचला. या मालिकेतील करणच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मात्र अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी करण एका फास्ट फूड आऊटलेटमध्ये काम करायचा. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत खुद्द करणनेच याबद्दल सांगितलं होतं. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये करणने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो पिझ्झा बनवताना दिसत आहे. बारावीच्या परीक्षांनंतर फास्ट फूड आऊटलेटमध्ये ट्रेनी म्हणून काम करायला सुरुवात केल्याचं करणने या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. फ्रेंच फ्राइज बनवतानाचा फोटोसुद्धा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. (Yeh Rishta fame Karan Mehra reveals he worked at a fast food outlet before acting)

'बारावीनंतर डॉमिनॉजमध्ये ट्रेनी म्हणून कामाला लागलो आणि पहिल्या नोकरीत मी पिझ्झा कसा बनवायचा ते शिकलो. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा शिकलेली प्रत्येक गोष्ट आयुष्यात कामी आल्याचं जाणवतं. अजूनही घरात मी पिझ्झा आणि फ्रेंच फ्राइज बनवायला शिकतोय', असं कॅप्शन त्याने दिलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून करण त्याच्या खासगी आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. पत्नी निशा रावलने करणवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले. तिने दाखल केलेल्या तक्रारीनंतर करणला अटकसुद्धा झाली होती. छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय जोडी घटस्फोट घेणार असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आयुष्यात बरेच वादविवाद निर्माण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT