karan mehra and his wife  Team esakal
मनोरंजन

पत्नीच्या खात्यातून एक कोटी गायब, करण मेहरा अडचणीत

ये रिश्ता क्या कहलाता है फेम करण मेहरांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे....

युगंधर ताजणे

मुंबई - यह रिश्ता क्या कहलाता है (yeh rishta kya kehlata hai) या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता करण मेहराच्या (karan mehara) विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. करणच्या पत्नीनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईतल्या गोरेगांव पोलिसांनी (goregoan police) गुन्हा दाखल केला आहे. करण मेहरासह त्याच्या परिवारातील अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा यांची देखील नावे त्या तक्रार अर्जामध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.(yeh rishta kya kehlata hai actor karan mehra in trouble as mumbai police files case against him on wife nisha rawal complaints)

निशानं (nisha rawal) करण मेहरावर असा आरोप केला होता की, तिच्या अकाऊंटमधून करणनं एक कोटी रुपये काढले. याप्रकरणी गोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहे. याच्या अगोदर मुंबई पोलिसांनी 31 मे रोजी करण मेहराला अटकही केली होती. पत्नीला मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. करण मेहरा आणि निशा रावल यांचे लग्न 2012 मध्ये झाले होते. करण मेहरा हा नैतिक सिंघानिया यांची भूमिका करुन लोकप्रिय झालेला अभिनेता आहे. त्याचा सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्सही मोठा आहे.

मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून यह रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचं नाव घ्यावे लागेल. सर्वाधिक काळ चालू असणारी मालिका म्हणूनही या मालिकेची ओळख आहे. प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रियता या मालिकेच्या वाट्याला आली आहे. याप्रकरणात डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितले, करण मेहरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

यह रिश्ता क्या कहलाता है मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्याला प्रेक्षकांचा मिळणारा पाठींबा कौतूकास्पद आहे. त्या मालिकेतील एखादा प्रसिद्ध अभिनेता वेगळ्या प्रकारचे कृत्य करतोय अशी भावना प्रेक्षकांची झाल्यानं त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. या मालिकेचा प्रमुख कलाकार करण मेहराच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. मनोरंजन क्षेत्रातील मोठं नाव म्हणून करण मेहराकडे पाहिलं जातं. अशाप्रकारामुळे त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT