Aditi Sarangdhar  
मनोरंजन

'मालविका साकारताना मी अक्षरश: रडले'; आदितीने व्यक्त केल्या भावना

'या' कारणामुळे आदितीला कोसळलं रडू

शर्वरी जोशी

छोट्या पडद्यावरील अशा अनेक मालिका आहेत ज्या कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झाल्या आहेत. त्यातच सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला'. या मालिकेतील प्रत्येक कालाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे ओम, स्वीटू, नलू,शकू यांच्या भूमिकांसोबतच मालविकाची खलनायिकी भूमिकादेखील प्रेक्षकांना आवडत आहे. अनेकदा खलनायिकी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा प्रेक्षक काही काळासाठी तिरस्कार करु लागतात. मात्र, या मालिकेतील मालविकाविषयी म्हणजेच अभिनेत्री अदिती सारंगधरच्या बाबतीत काहीसं उलट चित्र आहे. तिची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना आवडत असून त्याची पोचपावतीदेखील अनेकांनी तिला दिला आहे. (yeu-kashi-tashi-mi-nandayla-actress-aditi-sarangdhar-share-some-shooting-memory)

"२० वर्षांच्या कारकिर्दीत मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारत आहे. खरंतर नकारात्मक भूमिका करायची असं मी कधी ठरवलं नव्हतं. मात्र, काम करण्याची इच्छा, कुटुंबासाठीचा वेळ आणि चित्रीकरणाचे तास या सगळ्या गोष्टी जुळून मला काम करायचं होतं. सुरुवातीच्या काळात मालविका साकारताना मी अक्षरश: रडले होते.कारण, अशा प्रवृत्तीची माणसं मी कधीच माझ्या आजुबाजूला पाहिली नव्हती. पण हळूहळू मला ते पात्र समजू लागलं", असं आदिती म्हणते.

पुढे ती म्हणते, "मालविका एक कणखर आणि बेधडक व्यक्ती आहे. मालिकेत जरी माझी भूमिका नकारात्मक असली तरीही त्यातून शिकण्यासारखं बरच काही आहे. 'घरातल्या व्यक्तींशी कसं वागू नये' हे दाखवण्याचं काम मालविकाने केलं आहे. आता मला हे पात्र साकारताना खूप मजा येते. प्रेक्षक मालविकाचा जितका तिरस्कार करतात, तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त मालविकाचं कौतुक करतात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

SCROLL FOR NEXT