Dipti and Anvita 
मनोरंजन

स्वीटू-नलूचा भन्नाट डान्स व्हायरल; सोशल मीडियावर ऑनस्क्रीन मायलेकी हिट

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील दिप्ती केतकर-अन्विता फलटणकरचा डान्स

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' yeu kashi tashi mi nandayla ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांची मनं जिंकली. यात ऑनस्क्रीन मायलेकींची भूमिका साकारणारे स्वीटू आणि नलू यांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. या दोघींमध्ये पडद्याबाहेर खूप चांगली मैत्री असून सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ ते पोस्ट करत असतात. नलूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिप्ती केतकरने Dipti Ketkar तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती आणि स्वीटूची भूमिका साकारणारी अभिनेत्री अन्विता फलटणकर Anvita Phaltankar या डान्स करताना दिसत आहेत. स्वीटू-नलूचा हा डान्स सोशल मीडियावर तुफान हिट ठरतोय. (yeu kashi tashi mi nandayla fame dipti ketkar and anvita phaltankar dance video viral)

सध्या इन्स्टा रिल्समध्ये ट्रेंडमध्ये असलेल्या 'वन डान्स'चं चॅलेंज स्वीटू-नलूने पूर्ण केलंय. या दोघींचा डान्स नेटकऱ्यांना खूपच आवडला असून अनेकांनी त्यावर कमेंट्स करत त्यांचं कौतुक केलं आहे. अन्विताला डान्सची फार आवड असून तिचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तर दिप्तीसुद्धा तिच्याइतकीच चांगली डान्सर आहे, याची प्रचिती या व्हिडीओतून येते.

दिप्ती-अन्विताची मैत्री

मदर्स डेनिमित्त दिप्तीने अन्वितासोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. 'स्वीटू म्हणजेच अन्विता पडद्यावर माझ्या मुलीची भूमिका साकारतेय म्हणून ऑफस्क्रीन किंवा खऱ्या आयुष्यात मी तिच्यासोबत पालकांसारखी वागणार नाही असं ठरवलं होतं. पण नकळत हे नातं जोडलं गेलं आणि आता आणखी घट्ट झालं', अशा शब्दांत दीप्तीने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. कदाचित लॉकडाउन किंवा दोघींचा स्वभाव सारखा असल्याने आमचं नातं खूप छानप्रकारे जोडलं गेलं असावं, असं तिने लिहिलं होतं. अन्विताने 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ती साकारत असलेली स्वीटूची भूमिका सध्या फार लोकप्रिय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT