dipti ketkar 
मनोरंजन

'ओव्हर अ‍ॅक्टिंगचे ५० रुपये कापा'; नलू मावशीची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सोशल मीडियावर नलू मावशीचा व्हिडीओ चर्चेत

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली 'येऊ कशी तशी मी नांदायला' Yeu Kashi Tashi Mi Nandayla ही मालिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे या मालिकेचा नवा प्रोमो. झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मालिकेचा नवीन प्रोमो पोस्ट केला आहे. या प्रोमोमधील नलू मावशी अर्थात अभिनेत्री दिप्ती केतकर Dipti Ketkar यांच्या अभिनयावरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. 'ओव्हर अ‍ॅक्टिंगचे ५० रुपये कापा', असे कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केले आहेत. (yeu kashi tashi mi nandayla nalu mavshi aka dipti ketkar trolled for over acting)

या मालिकेत सध्या ओम आणि स्वीटूची लव्हस्टोरी दाखवण्यात येत आहे. स्वीटू आणि ओमच्या प्रेमाला स्वीटूच्या आईचा म्हणजेच नलिनीचा विरोध आहे. या नव्या प्रोमोमध्ये नलू मावशी स्वीटूवर राग व्यक्त करताना दिसते. ओमकार आणि स्वीटूचं बोलणं थांबवण्यासाठी ती चक्क स्वीटूचा फोन आगीत फेकून देते. याच दृश्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 'आधीच भिकेचे डोहाळे आणि नाटक बघा, मोबाइल आगीत', अशी कमेंट एकाने केली. तर 'नलू मावशीचा कंगवा कोणी चुलीत टाकला होता का? त्याचाच सूड ती घेतेय', असं दुसऱ्याने लिहिलं.

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत अन्विता फलटणकर ही स्वीटूची तर शाल्व किंजवडेकर हा ओमकारची भूमिका साकारतोय. या दोघांशिवाय मालिकेत शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दिप्ती केतकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT