मनोरंजन

'बंद करून टाका मालिका'; स्वीटू-मोहितच्या लग्नावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया

मालिकेच्या कथानकातील विचित्र वळण पाहून प्रेक्षक सोशल मीडियावर भडकले आहेत.

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' Yeu Kashi Tashi Mi Nandayla या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. ओमकार, स्वीटू, नलू मावशी, मोहित या भूमिका आणि त्यांना साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत स्वीटूच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र कथानकात अचानक ट्विस्ट आल्याने सोशल मीडियावर आता प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

मालिकेच्या कथानकात 'विनाकारण' आलेलं ट्विस्ट

अनेक अडचणींवर मात केल्यानंतर अखेर ओम आणि स्वीटू लग्नबंधनात अडकणार होते. नलू मावशीनेही या लग्नाला होकार दिला होता. लग्नाचा हा दोन तासांचा विशेष भाग पाहण्यासाठी प्रेक्षकसुद्धा आतुर झाले होते. मात्र ऐनवेळी स्वीटूचं लग्न ओमकारसोबत न होता मोहितसोबत झाल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं. ओमकार लग्नाच्या मुहूर्तावेळी कुठे, कसा गायब होतो, हे कोणालाच कळत नाही. मालिकेच्या कथानकातील हे विचित्र वळण पाहून प्रेक्षक सोशल मीडियावर भडकले आहेत.

प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया

झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर मालिकेचा नवीन प्रोमो व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत राग व्यक्त केला आहे. 'सीरिअल लांबवण्याची निंजा टेक्निक', असं एकाने उपरोधिकपणे लिहिलंय. तर हा निव्वळ फालतूपणा आहे, मालिका बंद करा अशी मागणी दुसऱ्या युजरने केली आहे. 'मालिकेत थोडाफार रस होता, आता तोसुद्धा निघून गेलाय', अशी कमेंट नेटकऱ्याने केली.

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत अभिनेत्री अन्विता फलटणकर ही स्वीटूची भूमिका साकारतेय. तर अभिनेता शाल्व किंजवडेकर हा ओमकारच्या भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT