Kolhapur mayor tenure controversy
esakal
कोल्हापूर : महापौरपदाचा कालावधी सव्वा वर्षाचाच आहे. मुख्यमंत्र्यांनीच हे प्रथम स्पष्ट केले असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी ‘सकाळ’ला दिली. थेट मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीतील चर्चेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत खासदार महाडिक उपस्थित होते. त्यामुळे महाडिक यांनीच ही स्पष्टता केल्याने कालावधीच्या विषयावर पडदा पडल्यात जमा (Dhananjay Mahadik mayor tenure statement) आहे.