Yo Yo Honey Singh dating actress tina thadani? details Inside Google
मनोरंजन

Honey Singh: घटस्फोटानंतर हनी सिंग अभिनेत्री टीना थडानीच्या प्रेमात, एका ब्रेसलेटनं खोललं गुपित

हनी सिंगनं काही दिवसांपूर्वीच आपला १० वर्षांचा संसार मोडत पत्नी शालिनी तलवारला सोडचिठ्ठी दिली होती.

प्रणाली मोरे

Honey Singh: रॅपर आणि सिंगर यो यो हनी सिंग यानं काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांना एकदम धक्का दिला होता,जेव्हा त्याला एका अनोळखी महिलेसोबत स्पॉट केलं गेलं होतं. हनी सिंग नेहमीच आपल्या लव्ह लाइफमुळे चर्चेत राहिला आहे. काही दिवस आधीच हनी सिंगचा घटस्फोट झाला,त्याला काही दिवस होत नाही तोवर हनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पुन्हा त्याला एका सुंदर हॉट अभिनेत्रीसोबत स्पॉट केलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या त्या अप्सरेसोबत हनीनं फोटो शेअर केले ज्यात तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता,पण फोटो अन् त्याला दिलेलं कॅप्शन पाहून वाटत होतं की हनी आपल्या नवीन जोडीदाराची ओळख करुन देत आहे. (Yo Yo Honey Singh dating actress tina thadani? details Inside)

आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी याचा छडा लावत म्हटलं आहे की हनीसोबत त्या फोटोत मॉडेल आणि अभिनेत्री टीना थडानी आहे. लोक असं का म्हणू लागलेयत ते थोडं सविस्तरपणे जाणून घेऊया.

मंगळवारी हनीनं दोन हातांचा क्लोजअप शॉट शेअर केला आहे. कॅप्शन मध्ये लिहिलं होतं की, ''हे सगळं आपल्यासाठी आहे,फक्त तू आणि मी. माझं गाणं टुगेदर फॉरएव्हर आपल्या भेटीस आलं आहे''. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत रील्स बनवा. काही लोकांनी म्हटलं आहे की हनी त्याच्या नवीन रिलेशनशीपविषयी खुलासा करत आहे. तर एका पोस्टमधून दावा करण्यात आला आहे की हनी जिला डेट करत आहे ती मॉडेल-अभिनेत्री टीना थडानी आहे.

आता प्रूफ म्हणून इथं एवढं मात्र नक्कीच सांगता येईल की हनी सिंगनं पोस्ट केलेला फोटो आणि त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला टीनाचा आताचा फोटो हा सेम आहे. आणि दुसऱ्या एका फोटोत टीनाच्या हातात तेच ब्रेसलेट आहे जे हनीन पोस्ट केलेल्या फोटोत जी महिला आहे तिच्या हातात आहे. काही लोकांचे म्हणणे पडले की हनी आणि टिना गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या फोटोवर कमेंट आणि लाइक करताना दिसत आहेत. आणि म्हणूनच फोटोतील ब्रेसलेटमुळे हनी टिना थडानीलाच डेट करत असल्याचं लोक म्हणू लागलेयत.

हनी सिंगनं २०११ मध्ये शालिनी तलवारसोबत लग्न केलं होतं. दोघांच्या घटस्फोटाची केस खूप काळ चालू होती. शालिनीनं हनीवर कौटुंबिक अत्याचाराचा आरोप केला होता. रिपोर्टेनुसार कळत आहे की, हनीनं शालिनीला पोटगी म्हणून १ करोड रुपये दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT