Elvish Yadav,Sagar Thakur esakal
मनोरंजन

Elvish Yadav: "मला काही झाले तर त्याला एल्विश यादव जबाबदार असेल"; मारहाण प्रकरणानंतर युट्यूबरनं शेअर केला व्हिडीओ

Elvish Yadav: सागर ठाकुरनं एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सागरनं हरिणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्याकडे एल्विश यादवला अटक करण्याची मागणी केली आहे.

priyanka kulkarni

Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) सीझन-2 चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) हा सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. एल्विशनं एका युट्यूबरला बेदम मारलं आहे. या प्रकरणी एल्विश यादवच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, एल्विश हा सागर ठाकुरला (मॅक्सटर्न) मारहाण करत आहे. सागर ठाकुरनं एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता सागरनं हरिणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्याकडे एल्विश यादवला अटक करण्याची मागणी केली आहे.

सागरनं शेअर केला व्हिडीओ

सागरनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो,"मला आता समजले आहे की जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही FIR देखील बदलू शकता. एल्विशने मला भेटण्यासाठी एक लोकेशन दिलं होतं. ते लोकेशन एका घराचे होते. मला त्याला सार्वजनिक ठिकाणी बोलवायला हवे होते. एकंदरीत मला ही लढाई शब्दांनी जिंकायची होती.मी त्यासाठी तयारी देखील केली होती. मी सोफा वगैरे तिथे ठेवला होता. मी विचार केला की एल्विश आला की आम्ही समोरासमोर बसून बोलू. पण एल्विशनं येताच हल्ला करण्यास सुरुवात केली."

पुढे सागर म्हणाला, "एल्विश अनेक मित्रांसह आले. एल्विशने माझ्या नाकावर मारले. त्यानंतर त्याने फोनने माझ्या मणक्यावर मारलं. तुम्हाला माहीत आहे की, जर तुमचा मणका तुटला तर तुम्ही आयुष्यभरासाठी अपंग होऊ शकता. एल्विशवनं मला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली."

"एल्विश आणि त्याच्या माणसांनी माझ्याकडून माफी मागून घेण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना सॉरी म्हणालो नाही. हळूहळू माझा मणका दुखू लागला. मला झोप येत नव्हती. जेव्हा मी मेडिकलसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही एफआयआरशिवाय मेडिकल करू शकत नाही. यानंतर मी पोलीस ठाण्यात गेलो. मी पोलिसांना म्हणालो की,हा खुनाचा प्रयत्न आहे. SHO माझ्याशी चांगल्या पद्धतीनं बोलले. यानंतर त्यांनी आपल्या इन्स्पेक्टरला बोलावून ही गोष्ट सार्वजनिक करू नको, असे सांगितले. तेव्हा मला वाटले की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जाईल."

सागर म्हणाला, "मला काही झाले तर त्याला एल्विश यादव जबाबदार"

"मी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना एल्विशला अटक करण्यासाठी मदती करण्याची विनंती करतो. जर इथे माझ्यावर अन्याय होत असेल तर लोकांना समजेल की, भारतीय कायदे फक्त गरिबांसाठी बनवले आहेत, श्रीमंतांसाठी नाही. शेवटी मला काही झाले तर त्याला एल्विश यादव जबाबदार असेल"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT