Zanai Bhosle news esakal
मनोरंजन

Zanai Bhosle Debut : आशा भोसलेंची नात जनाई शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातून करणार डेब्यू! दिसणार 'या' भूमिकेत?

जनाईच्या त्या (Zanai Bhosle Debut) पोस्टनं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

युगंधर ताजणे

Zanai Bhosle Asha Bhosle Granddaughter : बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा केवळ भारतातच नाही तर जगाच्या पाठीवरील वेगवेगळ्या देशांमध्ये मोठा चाहतावर्ग असल्याचे दिसून आले आहे. अशातच त्यांची नात जनाई बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. जनाई ही आता बॉलीवूड डेब्यू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जनाई तिच्या वेगवेगळ्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

आपल्या बहारदार गायकीनं चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना, श्रोत्यांना स्वरानंद देणाऱ्या आशा भोसले यांचा चाहतावर्ग मोठा आहे. वयाची ८० वर्ष पूर्ण केल्यानंतरही आशाजी यांचा उत्साह प्रचंड असल्याचे दिसून आले आहे. त्या सोशल मीडियातून चाहत्यांशी संवाद साधतानाचे काही व्हिडिओ समोर आले होते. अशातच त्यांची नात जनाईच्या व्हिडिओनं चाहत्यांच्या प्रतिक्रिया उधाण आले आहे.

आशाजी यांच्यानंतर त्यांची लाडकी नात जनाई ही बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वताच्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. त्यात आलिया आणि रणबीर कपूरचे नाव घ्यावे लागेल. त्यात आता जनाईच्या नावाची भर पडली आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मितीची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. सध्या बॉलीवूडमध्ये या विषयावर तीन ते चार चित्रपट तयार होत असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यापैकी एक अशा चित्रपटातून जनाई बॉलीवूड डेब्यू करणार असल्याचे बोलले जात आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप सिंह यांच्या द प्राईड ऑफ भारत - छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या चित्रपटामध्ये जनाई झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जनाई ही त्या चित्रपटामध्ये महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. यावर संदीप सिंहनं प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, जनाई ही खूपच टँलेंटेड अभिनेत्री आहे. तिच्याविषयी लोकांना फार कमी माहिती आहे. आम्ही तिच्या डेब्यूविषयी देखील उत्सुक आहोत.

जनाई ही चांगली गायिका देखील आहे. ती ज्या कुटूंबातून येते त्यात तिच्यावर असणाऱ्या अपेक्षांचे ओझे मोठे आहे. ती या चित्रपटातून एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेतून समोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Crime: लॅबमध्ये बोलवलं; संधी मिळताच जवळ ओढून चुंबन घेतलं, नंतर...; शाळेतच महिला शिक्षिकेसोबत दुसऱ्या शिक्षकाचं विकृत कृत्य

SCROLL FOR NEXT