Zara Hatke Zara Bachke Collection Day 7:  Esakal
मनोरंजन

Zara Hatke Zara Bachke Day 7 Box Office Collection: सातव्या दिवशी 'जरा हटके जरा बचके' ची कमाई व्हेंटिलेटर?

Vaishali Patil

गेल्या काही दिवसात बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत बोलायच झालं तर पठाण आणि द केरळ स्टोरी शिवाय दुसरे काही चित्रपट काही खास कमाल करु शकले नाहीत. मात्र सारा आणि विकी कौशलच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

याचा अंदाज चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यावरुन येतो. लवकरच हा चित्रपट आपल्या बजेटपेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट किती कमाई करेल याकडे आता निर्मात्यांच लक्ष लागलं आहे.

विकी कौशल आणि सारा अली खान यांची जोडी 'जरा हटके जरा बचके'मध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातील दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे.

चित्रपटाची ओपनिंग खूप चांगली झाली. यानंतर वीकेंडलाही या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला असला तरी आठवड्याच्या दिवसात चित्रपटाची कमाई कमी झाली आहे.

सचनिकच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने सातव्या दिवशी 3.25 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे, त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 37.36 कोटींवर गेली आहे. तर चित्रपटाचे बजेट फक्त 40 कोटी आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट बजेटपेक्षा जास्त कमाई करु शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जरा हटके जरा बचकेने पहिल्या दिवशी 5.49 कोटी.दुसऱ्या दिवशी 'जरा हटके जरा बचके'ने 7.2 तर तिसऱ्या दिवशी 9.9 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी 4.14 कोटी, पाचव्या दिवशी 3.87 कोटी तर सहाव्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 3.51 कोटी रुपये इतक होत. 'जरा हटके जरा बचके'ची एकूण कमाई आता 37.36 कोटींवर गेली आहे.

एका मध्यमवर्गीय कुटूंबाची कथा असलेल्या या चित्रपटात सारा आणि विकी स्वत:च घर घेण्यासाठी धडपडत असतात. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्यामुळे ते घटस्फोटही घेतात. त्यानंतर अनेक रंजक वळण या कथेला येते.

स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर विकी आणि सारा यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. नीरज सूद, कनुप्रिया पंडित, राकेश बेदी, हरचरण चावला, आकाश खुराना, सुष्मिता मुखर्जी आणि शरीब हाश्मी सहाय्यक भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT