zareen khan 
मनोरंजन

अभिनेत्री झरिन खान लीलावती हॉस्पिटलवर संतापली, म्हणाली 'जेव्हा आपल्याला कोविड योद्धांची गरज असते..'

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री झरिन खानने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलवर संताप व्यक्त केला आहे. झरिनचा हा संताप तिच्या आजोबांना दाखल करुन न घेतल्याने बाहेर आला आहे. याच लीलावती हॉस्पिटलमध्ये अमिताभ आणि अभिषेक कोरोनाच्या संक्रमणामुळ दाखल होते आणि बिग बींनी या हॉस्पिटलमधील चांगल्या व्यवस्थेसाठी तेथील कर्मचा-यांचं कौतुक देखील केलं होतं. 

झरिन खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती लीलावती हॉस्पिटलवर तिचा संताप व्यक्त करत आहे. तिने तिच्या ८७ वर्षांच्या आजोबांच्या प्रकृतीबाबत बोलताना सांगितलं की, 'रविवारी रात्री माझ्या आजोबांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांना लगेचच लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेण्यात आलं. तिथे त्यांनी एक कोविड वॉर्ड बनवला होता.जिथे ते सगळ्यांची कोविड टेस्ट करत होते. माझ्या आजोबांचं तापमान चेक केल्यानंतर त्यांची कोविड टेस्ट केली आणि ती निगेटीव्ह आली. कारण लॉकडाऊन नंतर ते पहिल्यांदाच हॉस्पिटलला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. असं असून देखील त्यांनी उपचार सुरु केले नाहीत. जेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचा-यांना माझ्या आजोबांच्या उपचारांबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले आम्ही असंच काम करतो हा आमचा प्रोटोकॉल आहे.' 

झरिन व्हिडिओमध्ये पुढे सांगते, 'मी केवळ माझ्या मित्रमैत्रीणींकडून ऐकत आले होते की काहीही झालं तरी सध्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नकोस त्यांनी व्यवसाय बनवून ठेवला आहे. म्हणूनंच मी विचार केला की हे तुमच्यासमोर आणलं जावं. ज्यांना आपण कोविड योद्धे म्हणतो ते खरंतर जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते तेव्हा ते आपल्यासोबत असे वागतात.'

व्हिडिओच्या शेवटी तिने म्हटलंय की 'अखेर मी माझ्या आजोबांना घरी घेऊन आले आणि काही गरजेची औषधं दिली जेणेकरुन त्यांना थोडं बरं वाटेल. दुस-या दिवशी मी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेली तिथे त्यांना योग्य उपचार मिळाले.' झरिन खानचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचे चाहते यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.   

zareen khan angry on mumbai lilavati hospital after refused to admit her 87 years old grandfather  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Indrayani Express: इंद्रायणी एक्सप्रेस बालकासाठी थांबली; वेळेवर उपचाराने जीव वाचला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

SCROLL FOR NEXT