Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Night time Leg Cramps: गाढ झोपेत पायात तीव्र कळ येणे ही फक्त थकव्याची खूण नसून शरीरातील पोषक घटकांची कमतरता, गंभीर आजाराचे लक्षण असू शकते; वैद्यकीय अहवालातून मोठा खुलासा..
Why Do Leg Cramps Happen at Night Causes, Warning Signs, and Relief Tips

Why Do Leg Cramps Happen at Night? Causes, Warning Signs, and Relief Tips

esakal 

Updated on: 

Leg Cramps at Night: रात्री गाढ झोपेत असताना अचानक पायाच्या स्नायूंमध्ये तीव्र कळ येऊन झोप उडणे, ज्याला सामान्य भाषेत 'पायात गोळा येणे' (Leg Cramps At Night) म्हटले जाते, हा अनुभव अनेक जण घेतात. काही वेळेस पायाचा मागचा भाग इतका आखडतो की काही सेकंद किंवा मिनिटे पाय हलवणेदेखील कठीण होऊन बसते. ही वेदना काही काळापुरती असली तरी त्या क्षणी होणारी अस्वस्थता अत्यंत त्रासदायक असते.

अनेक जण या समस्येला सामान्य मानून दुर्लक्ष करतात. पण, ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, जर हा त्रास वारंवार होत असेल, तर त्यामागे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, मज्जासंस्थेवर ताण किंवा काही औषधांचे दुष्परिणाम यांसारखी महत्त्वाची कारणे असू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com