Man Udu Udu Zala- Hruta Durgule, Ajinkya Raut With New Entry? Google
मनोरंजन

'मन उडू उडू झालं' मध्ये आता प्रेमाचा त्रिकोण; इंद्रा,दीपू आणि 'ती'?

'झी मराठी' वरील या मालिकेतील त्या नव्या चेहऱ्याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.

प्रणाली मोरे

'झी मराठी' वरील मन उडू उडू झालं(Man Udu Udu Zala) ही मालिका जेव्हा पासून सुरू झाली आहे तेव्हापासूनच तिनं लोकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेतील इंद्रात (Indra)प्रत्येक मुलगी आपला जोडीदार शोधू लागलीय तर दीपू(Deepu) सारखी समजदार आपलीही जोडीदार असावी असं प्रत्येक मुलाला वाटू लागलं आहे. मालिकेचा टीआरपी ही चांगला आहे. आता तर मालिकेत एक असं रंजक वळण आलेलं दिसत आहे ज्यामुळे दीपू आणि इंद्रा विभक्त होण्याची चिन्ह दिसू लागलीयत. इंद्रानं तर साफ-साफ दीपूला सांगितलं आहे की,''देशपांडे सरांच्या मुलीवर प्रेम करायची इंद्राची लायकी नाही''. दीपू त्याची मनधरणी करतेय पण इंद्रा मात्र काही केल्या ऐकण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीय. दीपूनं त्याला एक प्रेमपत्र लिहिलंय ज्याचा प्रोमो सध्या दाखवला जात आहे. पण कळंतय की याचाही काही उपयोग होणार नाही. मालिकेत एक नवीन एन्ट्री होणार आहे अशीही उडती खबर आहे.

ही नवी एन्ट्री बोललं जातं आहे एका नवीन अभिनेत्रीची आहे. बोललं जात आहे की,इंद्रा आणि दीपू वेगळे झाल्यानंतर ही नवी एन्ट्री इंद्राच्या आयुष्यात होणार आहे. यापुढे काही दिवस त्या नव्या एन्ट्रीमुळे मात्र प्रेक्षकांना प्रेमाचा त्रिकोण पहायला मिळेल असंही कानावर पडलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नुकत्याच या नव्या एन्ट्रीसाठी ऑडिशन घेण्यात आल्या आहेत. नवा चेहरा कोण असेल यावरही निर्णय घेतला गेला आहे. मालिकेतल्या दीपूच्या तोडीस तोड असा हा चेहरा आहे असंही बोललं जात आहे. तेव्हा चला,आता काही दिवस प्रेक्षकांना इंद्रा-दीपूचं नातं तुटल्यामुळे होणारी नुसती तगमग पहाण्यापेक्षा हा नवा लव्ह अॅंगल, त्यातही प्रेमाचा त्रिकोण पहायला आवडेल एवढं मात्र नक्की. लवकरच त्या नव्या चेहऱ्याचा प्रोमो पहायला मिळाला तर नवल नव्हे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT