ashish vidyarthi  Team esakal
मनोरंजन

सनफ्लॉवरचा टीझर प्रदर्शित, आशिष विद्यार्थींची दमदार भूमिका

सनफ्लॉवर मध्ये कॉमेडियन सुनील ग्रोव्हरची भूमिका आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - झी 5 ची निर्मिती असलेली आणि डार्क ह्युमर प्रकारातील आगळ्या वेगळ्या प्रकारातील मालिका सनफ्लॉवर आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आता त्या मालिकेचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्या मालिकेत प्रसिध्द अभिनेते आशिष विद्यार्थी यांची प्रमुख भूमिका आहे. मालिकेत दमदार भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये मालिकेतील अनेक पात्रांची ओळख करुन देण्यात आलीय.

सनफ्लॉवर मध्ये कॉमेडियन सुनील ग्रोव्हरची भूमिका आहे. त्यात त्यानं सनफ्लॉवर सोसायटीचे नेतृत्व केलं आहे. तसेच इन्स्पेक्टर दिगेंद्रची भूमिका रणवीर शौरी, त्याच्या टीममध्ये गिरीश कुलकर्णी, दिलिप अय्यरच्या भूमिकेत आशिष विद्यार्थी, मिस्टर आहूजाच्या भूमिकेत मुकूल चड्डा, त्याच्या पत्नीच्या भूमिकेत राधा भट्ट याशिवाय आशिष कौशल, शोनाली नगरानी यांच्याही लक्षवेधी भूमिका या मालिकेत आहेत.

आपल्या भूमिकेविषयी आशिष विद्यार्थी यांनी सांगितले की, मी माझ्या वास्तवातील आयुष्यात अनेक लोकांना भेटलो आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे. मला त्यांच्यातील वेगळेपण कायमच भावले आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायलाही मिळाले आहे. सध्या या मालिकेत जी भूमिका आहे त्यात मला व्यक्तिमत्वाच्या बाबत अभ्यास करावा लागला. सनफ्लॉवर ही वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांची सोसायटी आहे. त्यातून एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.

रिलायन्स एंटरटेंन्मेंट निर्मित ही मालिका शृंखला विकास यांनी लिहिली आहे. त्याचे दिग्दर्शन राहुल सेनगुप्ता आणि विकास बहल यांनी दिग्दर्शित केली आहे. तिचा प्रिमियर 11 जुनला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकरी कर्जमाफीसाठी बॅंकांची माहिती तयार! ३० जून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदारांचा समावेश; नियमित कर्जदारांना मिळणार ‘हा’ लाभ

Yogi Adityanath : औरंगजेबाची मोठी घोडचूक काय होती? वीर बाल दिवसानिमित्त योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल!

आजचे राशिभविष्य - 28 डिसेंबर 2025

Panchang 28 December 2025: आजच्या दिवशी मंजिष्ठ, केशर किंवा रक्तचंदन पाण्यात टाकून स्नान करावे

Winter Special Recipe: हिवाळ्याची खास चव! शेंगाचा सिझन संपायच्या आधी सोल्याचे कढिगोळे नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT