Zeenat Aman Bollywood Actress Tell to youth clothes esakal
मनोरंजन

'Zeenat Aman : 'माझे कपडे अन् दागिने हे सारं उधारीचं, तुम्ही पण कधीही...'! जीनत अमान यांनी तरुणांना दिला मोठा सल्ला

जीनत अमान यांची ती पोस्ट आता नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

युगंधर ताजणे

Zeenat Aman Bollywood Actress Tell to youth clothes : प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान या नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी चर्चेत असतात. ७० ते ८० च्या दशकांत आपला अभिनय आणि सौंदर्य यामुळे चाहत्यांच्या मनात जीनत अमान यांनी वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली होती. ती अजूनही कायम आहे.

सध्या जीनतजी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येते. त्या वेगवेगळ्या पोस्ट आणि त्यातून नवोदितांना काही प्रसंगातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच एका पोस्टमधून त्यांनी लक्ष वेधून घेतले असून त्याची चर्चाही होत आहे. यापूर्वी देखील त्यांनी व्हायरल केलेल्या पोस्टची चर्चा झाली होती. एका पोस्टमध्ये आजवर आपल्याला बॉलीवूडमधील कित्येक लोकांनी मनापासून सहकार्य केले यावर त्यांनी भाष्य केले होते.

आता जीनतजींनी एक फोटो शेयर करुन त्यावर मोठी पोस्ट शेयर केली आहे. त्या म्हणतात की, मी कपडे आणि दागिने उधारीवर आणते. तुम्हाला हा जो फोटो दिसतो आहे त्यात मी परिधान केलेले कपडे आणि दागिने माझे नाहीत. ते मी दुसऱ्याकडून उधारीवर आणले आहेत. ते एका डिझायनरचे आहेत. जे मी त्यांना फोटो काढल्यावर परत देणार आहे. यासोबतच त्यांनी यावेळी तरुणांना एक सल्लाही दिला आहे.

तुम्ही जेव्हा एखाद्या सेलिब्रेटीजचे कपडे पाहता तेव्हा त्यावरुन जास्त विचार करु नका. तुम्ही त्यावरुन स्वताला जास्त कमी जास्त लेखण्याचा प्रयत्नही करु नका. त्यामुळे हाती निराशाच येईल. तुमच्याकडे जितकं आहे त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. त्या फोटो कॅप्शनमध्ये जीनत यांनी लिहिलं आहे की, माझं लग्न आणि मुलंबाळं हा माझा वैयक्तिक प्रश्न होता. आम्ही सिंगापूरला गेलो आणि तिथं दोन साक्षीदारांच्या मदतीनं लग्न केले होते.

आपल्याकडे होणारी लग्नं, त्यातील तयारी आणि तो माहौल हे मला माहिती आहे. हे सगळीकडे असतेच. त्याप्रकारचे सेलिब्रेशन कुणाला नको असते. तुम्ही जो फोटो पाहता आहात तो दिल्लीतील एका कार्यक्रमातील आहे. त्यात मी जे कपडे परिधान केले आहे ते एका डिझायनरचे आहे. हे सिक्रेट मला तुम्हाला सांगायचे होते.

तरुणांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे, तुम्ही प्रत्येकवेळी नवीन कपडे घेण्याचा विचार करु नका. आपली जेवढी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त खर्चाचा विचार नेहमीच त्रासदायक ठरतो. तुम्ही जेव्हा मोठमोठे सेलिब्रेटी पाहता तेव्हा मात्र त्यांना पाहिल्यावर तुमच्या हाती निराशा आल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT