Zeenat Aman Instagram
मनोरंजन

Zeenat Aman 'सत्यम शिवम सुंदरम' मधील बोल्ड लुकवर अखेर बोलल्याच..वयाच्या सत्तरीत केला सेटवरील शूटिंगचा खुलासा

झीनत अमान यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर 'सत्यम शिवम सुंदरम' मधील एक जुना फोटो पोस्ट करत त्यावेळी सिनेमावरनं झालेल्या वादावर भाष्य केले आहे.

प्रणाली मोरे

Zeenat Aman: सत्तर च्या दशकातल्या प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एन्ट्री केली आहे. सोशल मीडियावर त्या आपले काही जुने-नवे फोटो शेअर करताना दिसतात. आता त्यांनी आपल्या 'सत्यम शिवम सुंदरम' सिनेमातील एक फोटो शेअर केला आहे. आणि यासोबतच सिनेमामुळे त्या काळात झालेल्या काही वादांचा उल्लेख केला आहे.

झीनत अमान आणि शशी कपूर अभिनित 'सत्यम शिवम सुंदरम' त्यावेळच्या सर्वाधिक वादग्रस्त सिनेमांपैकी एक आहे. सिनेमात झीनत अमान यांनी घातलेले छोटे कपडे,बोल्ड सीन्स यांनी त्यावेळी खळबळ उडवून दिली होती.

झीनत अमान यांनी सिनेमात रूपा ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्याआधी या रोल साठी विद्या सिन्हा,हेमा मालिनी आणि डिंपल कपाडिया यांना विचारणा करण्यात आली होती. पण सिनेमात अंगप्रदर्शन खूप करावं लागणार असल्यामुळे त्यांनी भूमिकेला नकार दिला होता.(Zeenat Aman photo from satyam shivam sundaram movie controversy post viral )

झीनत अमान यांनी 'सत्यम शिवम सुंदरम' सिनेमातील फोटो शेअर करत लिहिलं आहे की,''सत्यम शिवम सुंदरम लूक टेस्ट दरम्यान १९७७ मध्ये फोटोग्राफर जेपी सिंघल यांनी हा फोटो शेअर केला होता. आम्ही सीरीज आरके स्टुडिओत शूट केली होती. माझा कॉस्च्युम ऑस्कर विनिंग डिझायनर भानू अथैय्या यांनी डिझाइन केला होता''.

''ज्यांना कुणाला बॉलीवूडचा इतिहास माहित आहे,त्यांना 'सत्यम शिवम सुंदरम' सिनेमातील रूपाच्या भूमिकेवरनं झालेले वाद ज्यांनी खळबळ उडवून दिली होती ते नक्कीच माहिती असतील. मला नेहमीच माझ्यावर लावल्या गेल्या अश्लीलतेचे आरोप हैराण करून सोडतात..कारण मला मानवी शरीरात कोणतीच अश्लीलता दिसत नाही''.

''रुपाचं छोट्या कपड्यात दिसणं हा तिच्या भूमिकेचा एक भाग होता. सगळं कोरियोग्राफ्ड असतं,रिहर्सल होतात आणि सेटवर अनेक क्रू मेंबर्ससमोर ती रिहर्सल होते''.

झीनत अमान पुढे लिहितात,''दिग्दर्शक राज कपूर यांनी सिनेमासाठी माझी निवड केली खरी पण माझ्या वेस्टर्न इमेजमुळे ते थोडे चिंतेत होते. त्यांना डाऊट होता की मला या रुपाच्या अवतारात लोक स्विकारतील की नाही. त्यामुळे लूक टेस्ट करण्यात आली. त्यानंतर याच लूक टेस्टच्या आधारावर आम्ही लता मंगेशकरांच्या 'जागो मोहन प्यारे' गाण्यावर एक छोटीशी रील शूट केली होती.

राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'सत्यम शिवम सुंदरम' सिनेमा त्यावेळी वादानं घेरला होता. अनेक लोकांनी सिनेमाच्या बोल्ड कथानकामुळे त्यावर बंदी आणण्याची मागणी केली होती.

झीनत अमान यांनी सिनेमात भिजलेली एक पारदर्शक साडी नेसली होती. यामध्ये किसिंग सीन आणि काही इंटिमेट सीन देखील होते ज्यावरनं खूप गोंधळ झाला होता.

देव आनंद यांनी एका मुलाखतीत या सिनेमाला चक्क 'गंदा सिनेमा' असं म्हटलं होतं.

ते म्हणाले होते की,'' कॅमेऱ्यानं अख्ख्या सिनेमात फक्त झीनतच्या शरीराला दाखवलंय..जे खूपच वाईट दिसत आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

FDA Crime : आयुर्वेदिक औषधांत आढळली बुरशी अन्‌ अळ्या; इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना रद्द

SCROLL FOR NEXT