zinda banda jawan song shah rukh khan atlee release today full song on social media SAKAL
मनोरंजन

Zinda Banda Jawan: सळसळती ऊर्जा, कडक डान्स.. शाहरुखच्या जवानचं पहिलं गाणं जिंदा - बंदा

जिंदा बंदा असं या गाण्याचं नाव असुन या गाण्यात शाहरुखचा रॉकींग अंदाज पहायला मिळतोय.

Devendra Jadhav

Zinda Banda Song News: शाहरुख खानच्या जवान सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. जवानच्या टीझर पासुनच शाहरुख खानचा लुक, अॅक्शन, डायलॉग अशा अनेक गोष्टींची जोरात चर्चा सुरु आहे.

अशातच आज सोमवारी जवान मधलं पहिलं गाणं रिलीज झालंय. जिंदा बंदा असं या गाण्याचं नाव असुन या गाण्यात शाहरुखचा रॉकींग अंदाज पहायला मिळतोय.

(zinda banda jawan song shah rukh khan atlee release today full song on social media)

जिंदा बंदा गाण्याचं वैशिष्ट्य काय?

जवानच्या जिंदा बंदा गाण्यात पहायला मिळतं की सुरुवातीला शाहरुख घोळक्यातुन त्याच्या खास स्टाईलने चालत येतो. त्याने लाल रंगाचं शर्ट आणि जिन्स पॅंट घातली असते.

आणि मग पुढे जिंदा बंदा गाण्याच्या खास स्टेपवर शाहरुख सळसळत्या एनर्जीने नाचताना दिसतो. शाहरुखच्या मागे अनेक डान्सर दिसत आहेत.

शाहरुख विविध गेटअपमध्ये दिसतोय. शाहरुख ज्या सफाईदारपणे नाचलाय त्याला तोड नाही. मध्येमध्ये शाहरुखचा पोलिस लुक सुद्धा पहायला मिळतोय. पण हा लुक संपुर्णपणे उघड झाला नाहीय.

शाहरुखच्या मागे १००० मुली नाचत आहेत

जिंदा बंदा हे प्रेक्षकांसाठी अ‍ॅक्शन-पॅक्ड असलेलं व्हिज्युअल गाणं आहे. या गाण्यात शाहरुख नेहमीप्रमाणेच रॉकींग अंदाजात डान्स करत असुन शाहरुखच्या मागे 1000 हून अधिक महिला डान्सर्स नाचताना दिसत आहेत. अनिरुद्धने हे गाणं संगीतबद्ध केलंय

या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे चेन्नई, हैदराबाद, बंगलोर, मदुराई, मुंबई आणि इतर अनेक भारतीय शहरांमधील 1000 हून अधिक नर्तकांसह, चेन्नई येथे पाच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रित केले गेले.

जिंदा बंदामध्ये शाहरुखसोबत प्रियामणी, सान्या मल्होत्रा ​​आणि जवान मधील इतर अभिनेत्री देखील आहेत.

जवानची रिलीज डेट

शाहरुखचा जवान हा चित्रपट हा रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रेझेंटेशन आहे. ज्याचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले असून गौरी खाननं निर्मात्या तर गौरव वर्मा सह-निर्मात्याच्या भूमिकेत आहे.

हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT