Zindagi Na Milegi Dobara 2 Esakal
मनोरंजन

Zindagi Na Milegi Dobara 2: 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सिक्वेल येणार? फरहानची पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Zindagi Na Milegi Dobara 2: जिंदगी ना मिलेगी दोबारा हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. 2011 मध्ये रिलीज झालेला या चित्रपटाची कथा, अप्रतिम संगीत, मैत्रीचा विषय प्रेक्षकांना खुपच आवडला. हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांची ही कहानी प्रत्येकाच्या हृदयाला भिडली अन् चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुराळा उडवला होता.

झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक शिवाय फरहान अख्तर, कतरिना कैफ आणि कल्की कोचलिन मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाची कथा आणि पटकथा झोया अन् रीमा कागतीने तयार केली होती.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गाजला. 45 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 90.27 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

आता एकीकडे फरहान रणवीर सिंहसोबत त्याच्या डॉन या चित्रपटाचा तिसरा भाग तयार करत आहेत. तर दुसरीकडे फरहानचे चाहते त्याने जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटाचा सिक्वेल तयार करावा अशी मागणी करत आहेत.

आता सध्या बॉक्स ऑफिसवर सिक्वेलचा धडाका सुरु आहे त्यात गदर 2 ओएमजी 2 या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे प्रेक्षकानी फरहानकडे 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सिक्वेलची मागणी केली होती.

त्यातच आता फरहान अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाबाबत चाहत्यांना एक आंनदाची बातमी दिली आहे फरहानने त्याच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'ची दिग्दर्शिका झोया अख्तर टॅग करुन लिहिलं, "इमरानचा लूक पूर्णपणे तयार झाला आहे. काय म्हणतात झोया अख्तर मुलांनी दुसर्‍या रोड ट्रिपला जावं का?"

आता यात त्याने झोया अख्तरला टॅग केलं अन् इमरानचं नावही घेतलं आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मधील फरहान इमरानच्या भुमिकेत होता. त्यामुळे आता चाहत्यांनी या पोस्टला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सिक्वेलबाबत मोठी हिंट दिल्याचं बोललं आहे. तर हृतिक रोशन, अभय देओल यांनी देखील लगेच या पोस्टला कमेंट केल्या आहेत.

यात हृतिक लिहितो की, 'चला मग...." तर अभय लिहितोय, 2012 पासून मी माझी बागवती पॅक केली आहे, मित्रांनो काय तुम्ही पॅक केलयं?" त्यामुळे आता फरहान त्याच्या दुसऱ्या ट्रीपसाठी तयार असून लवकरच प्रेक्षकांना 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चा सिक्वेल पहायला मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT