Maratha Agitation

कोकणाचे पाणी आष्टीला; मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत

निसार शेख

कडा (ता. आष्टी, जि. बीड) : मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आष्टी तालुक्यातील जनतेची पाण्याची समस्या लवकरच दूर करणार आहे. कोकणाचे समुद्रात वाहून जाणारे पाणी लवकरच आष्टीसह मराठवाड्याला मिळणार असून अकरा धरणे एकमेकांना जोडले जाणार आहे. पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा सोमवारी (ता. २६) कडा येथे पोचली. भव्य स्वागत यात्रेचे सभेत रुपांतर झाले. त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राम शिंदे, आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर रथात होते.

फडणवीस म्हणाले, विरोधकही यात्रा काढत आहेत. मात्र त्यांची परस्परांविरोधी हल्ले सुरु आहेत. त्यांच्या सत्तेची मुजोरी जनतेने पाहीली असल्यानेच त्यांना सत्तेवरुन खाली खेचत आमच्या हाती सुत्रे दिली. पुढील 25 वर्षे काँग्रेस - राष्ट्रवादी सत्तेवर येणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून अकरा धरणे ऐकमेकांना जोडून भविष्यातील मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा हटविला जाईल. यावेळी पंकजा मुंडे यांचेही भाषण झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT