Farmers son Yashwant Thorat has been appointed as Assistant Officer in mantralaya 
Maratha Agitation

कौतुकास्पद ! शेतात मजूरी करणारा यशवंत झाला अधिकारी

रामदास साबळे

केज : हालाखीच्या परिस्थितीत कधी मजूरी तर नंतर कंपनीत नोकरी करत ढाकेफळच्या यशवंत निळोबा थोरात याने एमपीएससीत यश मिळवत मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे त्याने एकाच वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक, विक्री कर निरीक्षक व सहाय्यक कक्षअधिकारी या तीन परीक्षांत यश मिळविले.

दोन एकर जमिन असलेल्या यशवंतने कधी स्वत:च्या शेतात तर कधी दुसऱ्यांच्या शेतात मजूरी केली. कुटूंबियांनीही त्याला शेती, मजूरी करुन आर्थिक मदत केली. पदवीनंतर पुणे, औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत विविध कंपन्यात रोजंदारीवर दिवसामजूरी व रात्री आभ्यास केला. पदरी आलेले अपयश पचवत तो मजूरी करुन अभ्यास करत होता. त्याला मैत्री मांदीयाळी संस्थेनेही हातभार लावला. त्याने २०१८ मध्ये ‘एआओ’ (असिस्टंट इंटेलिजन ऑफिसर) परिक्षेत यश मिळवले. २०१८-१९ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाय्यक पोलीस निरीक्षक, एस.टी.आय. व ए.एस.ओ. (सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मु़बई) अशा तीन पदाच्या परिक्षेत यश मिळवले.

अद्यापही गावी शेजाऱ्याच्या भीतींचा आधार घेऊन पत्र्याच्या घरात राहणाऱ्या गरीब कुटूंबातील सुपूत्र राज्याच्या मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर शासकीय सेवेत रूजू होणार आहे. तो अधिकारी म्हणून काम करताना पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगून राब-राब राबणाऱ्या घरच्यांच्या चेहऱ्यावरील आनंद इतरांना प्रभावित करणारा आहे.

"कुटूंबातील सर्वांनी केलेले कष्टाला मैत्र मांदियाळी संस्थेच्या माध्यमातून मिळालेला मदतीचा हात यामुळे यश मिळविता आले. मी सदैव या सर्वांच्या ऋणात जीवन व्यथीत करीन. शासकीय सेवेत काम करताना सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देण्यात समाधानी राहील." -यशवंत थोरात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google IIT Kharagpur: आयआयटी खरगपूरच्या एआय संशोधनासाठी गुगलकडून 50 लाख डॉलर्सचा निधी; सुंदर पिचाई यांची भावुक पोस्ट

Malegaon Sugar Factory : माळेगावची उसाला पहिली उचल ३९०० रुपये जाहीर

Latest Marathi News Live Update: नऱ्हे पोलिसांनी ८.५ तोळे सोन्याचे दागिने केले हस्तगत

MS Dhoni Brand Value: क्रिकेटमधून रिटायर, पण जाहिरातीत धोनीचाच जलवा! विराट, रोहित अन् सचिनलाही टाकले मागे

उद्या शुक्राचं स्वराशीत पुनरागमन! ५ राशींचं नशीब पालटणार; पैसा, प्रेम आणि नोकरीत मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT