lumpy skin disease sakal
Maratha Agitation

Jalna : जिल्ह्यातील ५६६ गावांमधील दोन हजार ७१९ पशुधन बाधित

लम्पी आतापर्यंत दगावले २९७ पशुधन

सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारांची व्याप्ती वाढत चालली आहे. आतापर्यंत तब्बल २९७ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. तर ५६६ गावांमधील तब्बल दोन हजार ७१९ पशुधन सध्या बाधित आहेत. दरम्यान, पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून पशुधनाच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे.

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग पशुधनामध्ये झपाट्याने होत आहे. मागील काही महिन्यांपासून लम्पी चर्मरोगाच्या संसर्गाने पशुधन शिकार झाले आहेत. विशेष म्हणजे लम्पी स्कीनचा संसर्ग आटोक्यात येण्याऐवजी विळखा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. परिणामी जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता.दहा) तब्बल ५६६ गावांमधील तब्बल सात हजार २९९ पशुधनाला लम्पी स्कीनची लागण झाली आहे.

यापैकी केवळ चार हजार २८३ पशुधन आतापर्यंत रोगमुक्त झाले आहेत. तर सध्या दोन हजार ७१९ लम्पी स्कीन ग्रस्त पशुधनावर उपचार सुरू आहेत. यामध्ये २४३ पशुधन हे गंभीर आजारी आहेत. दरम्यान, लम्पी स्कीनमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील दोन हजार ७१९ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. शिवाय पशुधन लम्पी स्कीन आजाराने ग्रासल्यानंतर पशुपालकांचे आर्थिक नुकसानही होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाढत झालेला लम्पी स्कीन आजाराचा विळखा हा पशुपालक, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणार ठरत आहे.

सव्वा चार लाख पशुधनाचे लसीकरण

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाचा वेग वाढविला आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता.दहा) चार लाख लाख २१ हजार पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहेत.

शासनाकडून १०३ पशुपालकांना भरपाई

लम्पी स्कीनने मृत्यू झालेल्या पशुधनाची नुकसान भरपाई पशुपालकांना शासनाकडून दिली जात आहेत. यात गायीचा मृत्यू झाला तर ३० हजार, बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार आणि वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजारांची मदत दिली जाते. आतापर्यंत पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून नुकसान भरपाईसाठी २४५ प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यापैकी १०३ पशुधन मालकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. तर १४२ प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT