Maratha Reservation 
Maratha Agitation

Maratha Reservation: ‘एकच मिशन मराठा आरक्षण’:, चिठ्ठी लिहून धाराशिवमध्ये तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

ईट (जि.धाराशिव) , ता.२५ : ‘एकच मिशन मराठा आरक्षण’या आशयाची चिठ्ठी लिहून निपाणी (ता.भूम ) येथील युवा शेतकरी प्रवीण काकासाहेब घोडके ( वय ३६) याने शेतात साडीने गळफास घेत बुधवारी (ता.२५) दुपारी आत्महत्या केली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी आणले असता त्याचा खिशात चिठ्ठी सापडली. त्यात ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ असा उल्लेख करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली. त्याच्या पश्‍चात आजी , वडील,पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

घोडके याने आत्महत्या केल्याने मराठा आरक्षणाच्या मुद्दा ज्वलंत बनत असल्याचं दिसत आहे. गेल्या चार दिवसांत चार मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आत्महत्या केली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम बुधवारी संपला आहे. पण, सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीत. त्यामुळे मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला होता. पण, सरकारला मराठा आरक्षणावर तोडगा काढता आलेला नाही. जरांगे पाटील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीवर ठाम आहेत. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या अध्यक्षेतेखालील समितीने आणखी कालावधी मागितला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार असा सवाल विचारला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा फटका! स्वारगेट मेट्रो स्थानकांत गळती, प्लॅटफॉर्मवर ठेवल्या बादल्या; पाहा VIDEO

Navi Mumbai Accident: नवी मुंबईत भरधाव कारचा कहर! १० जणांना चिरडले; २ ठार, ८ जण जखमी

Latest Marathi News Update : भीषण अपघात! नवी मुंबईत भरधाव कारने १० जणांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

IND vs ENG, 3rd T20I: पाऊस करणार गेम? भारत-इंग्लंड तिसऱ्या T20I सामन्यासाठी काय सांगतो नॉटिंगहॅमचा हवामान अंदाज?

Nanded: गुंठेवारी प्रमाणपत्रे आता घरबसल्या मिळणार ऑनलाइन; नांदेड मनपाची डिजिटल कारभाराकडे मोठी झेप, गैरप्रकारांनाही आळा बसणार

SCROLL FOR NEXT