MarathaKrantiMorcha on tomorrow at Akkalkot 
Maratha Agitation

#MarathaKrantiMorcha अक्कलकोटमध्ये उद्या मोर्चा ; विविध पक्ष होणार सहभागी

राजशेखर चौधरी

अक्कलकोट : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाजास 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या बंदला सोळा विविध समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे. सदर बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे.

आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,मल्लिकार्जुन पाटील, सचिन कल्याणशेट्टी,नगराध्यक्षा शोभा खेडगी यांच्यासह अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्ष,विवेकानंद प्रतिष्ठान,
वीरशैव लिंगायत समाज,अक्कलकोट तालुका मुस्लिम समाज,अक्कलकोट शहर भाजप,जनसेवा संघटना,अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, लहुजी शक्ती सेना,ग्रामदैवत मल्लिकार्जुन देवस्थान समिती,गुरव समाज संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, जैन समाज संघटना,वीरशैव ककय्या समाज,नाभिक समाज,प्रहार जनशक्ती पक्ष, संत गाडगेबाबा परीट समाज संघटना,भारिप बहुजन महासंघ या संघटनांनी पाठिंबा दिला असून ते सर्व समाज बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून मराठा समाजाच्या सर्व न्याय्य मागण्याची पूर्तता व्हावी यासाठी जाहीर पाठिंबा देणार आहेत असे आयोजकांनी सांगितले आहे.

अक्कलकोट शहरातील अत्यावश्यक सेवेतील म्हणजेच दवाखाने आणि औषध दुकाने वगळून इतर सर्वांचा १०० टक्के सहभाग राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सकाळी दहा वाजता सर्वजण बसस्थानक जवळील खंडोबा मंदिर येथे एकत्र जमणार आहेत.

त्यानंतर मोर्चास प्रारंभ होणार आहे.हा मोर्चा विजय कामगार चौक,एवन चौक, फत्तेसिंह चौक, मेन रोड,कापड मार्केटमार्गे कारंजा चौक येथे येणार आहे. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर तेथे जाहीर सभेत होणार आहे.या मोर्चाचे संयोजन अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले, देवस्थान समिती अध्यक्ष महेश इंगळे ,बाबासाहेब निंबाळकर,अरुण जाधव, बाळासाहेब मोरे, विक्रम शिंदे, बंडोपंत घाटगे,  राम जाधव, तम्मा शेळके, सुभाष गडसिंग, दिलीप काजळे, मनोज गंगणे, मनोज इंगुले, शितल फुटाणे, बाळासाहेब घाटगे, संदीप केत, मंगेश फुटाणे, केदार तोडकर, सुरेश कदम, ज्ञानेश्वर भोसले, अंबादास जाधव, योगेश पवार, सागर शिंदे, विशाल गव्हाणे, सागर गोंडाळ, संतोष भोसले, प्रविण घाडगे, गणेश भोसले, नाना मोरे, प्रशांत साठे, चेतन शिंदे, गोविंद शिंदे-माकणे, राजु शिंदे, सुखदेव चव्हाण आदिंसह तालुक्यातील मराठा समाज बांधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT