swine flue 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे महिलेचा मृत्यू

बालाजी माणिकवार

तुरोरी (उस्मानाबाद) : स्वाईन फ्लुमुळे तुरोरी (ता. उमरगा) येथील एका 49 वर्षीय महिलेचा गुरुवारी (ता. 4) पहाटे सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तापाच्या आजाराने त्रस्त असलेल्या महिलेवर सुरवातीला 27 सप्टेंबरला तुरोरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना उमरगा येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. उमरगा त्याच दिवशी एका खासगी रुग्णालयात रक्ताची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यादिवशी सोलापूरला हलविण्याचा सल्ला तेथीलही डॉक्टरांनी दिला. त्यामुळे या महिलेवर 27 सप्टेंबरपासून सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेला स्वाईन फ्लु झाल्याचे निदान 29 सप्टेंबर रोजी झाले होते. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी पहाटे दोनच्या सुमारास या महिलेचे निधन झाले. गुरुवारी सकाळी या महिलेवर तुरोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या तीन-चार दिवसांपासून गावातील ताप, सर्दी, खोकल्याने त्रस्त असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT