file photo
file photo 
मराठवाडा

चक्क पोलिसाला ७८ हजाराचा गंडा 

प्रल्हाद कांबळे

नांदेड :  पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलिसाच्या बँक खात्यातून एकदा नव्हे तर चक्क चारवेळा ७८ हजार रुपये अज्ञातानी आॅनलाईन काढून फसवणुक केली. ही घटना ता. १९ ते २० नोव्हेंबरच्या दरम्यान घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस अब्दुल रियाज रज्जाक (वय ३४) हे कामानिमित्त १९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरच्या दरम्यान मुंबई येथे गेले होते. यावेळी त्यांच्या मोबाईलवर एक संदेश आला. त्या संदेशात त्यांच्या शिवाजीनगर येथी स्टेट बॅक आॅफ इंडिया या शाखेतून १८ हजार रुपये काढल्याचे समजले. एटीएम कार्ड सोबत असतांना बँकेतून १८ हजार रुपये कसे निघाले असा विचार करत असतानाच पुन्हा थोड्या वेळाने परत २० हजार, पुन्हा २० हजार आणि चौथ्यांदा परत २० हजार असे ७८ हजार रुपये काढल्याचे धडाधड संदेश मोबाईलवर धडकले. त्यांना एकच आश्‍चर्याचा धक्का बसला. ते मुंबईत असल्याने बँकेत वेळेवर पोहचु शकले नाही. आपले काम आटोपून परत नांदेडला येऊन थेट बँकेत व्यवस्थापकाकडे गेले. घडलेला प्रकार त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिला. मोबाईलवर आलेले संदेश त्यांना दाखविले.

बँकेने या प्रकरणाची चौकशी केली असता त्यांचे आॅनलाईन पैसे काढल्याचे समजले. कार्ड आपल्या जवळ असताना खात्यातून परस्पर पैसे काढून घेतल्याने पोलिस असलेले अब्दुल रियाज रज्जाक हे हतबल झाले. शेवटी त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जावून आपली रितसर तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीमती पवार ह्या करित आहेत.

हेही वाचा...

दिड लाखाची फसवणुक 
कुंडलवाडी ठाण्यात गुन्हा 

नांदेड : वृक्षारोपन योजनेत बनावट कागदपत्र तयार करून दिड लाख रुपये शासकिय रक्कमेचा अपहार करणाऱ्या चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा कुंडलवाडी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 20) दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेळगाव थडी (ता. धर्माबाद ) येथील शिवारात वृक्षारोपनाचे काम हाती घेण्यात आले होते. सन 2017 मध्ये काही मजुर रोजंदारीतून वृक्षारोपन करण्यासाठी लावले. काही ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले. परंतु बऱ्याच भागात वृक्षारोपन करण्यात आले नाही. मात्र त्या ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाचे एक लाख 42 हजार 720 रुपये बनावट मजुराच्या खोट्या स्वाक्षऱ्या घेऊन बनावट कागदपत्र तयार करुन वरिल रक्कम उचलून घेतली. ही बाब शेळगाव थडी येथील मेघनाथ दशरथ पवार यांनी उचलून धरली. 

या प्रकरणात चौकशी होऊन संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी त्याने केली. परंतु शासकिय यंत्रणेने त्यांना मदत केली नाही. शेवटी ते न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशावरून कुंडलवाडी पोलिस ठाण्यात शंकर नवनाथ राजूरे, राधिका शंकर राजूरे, अशोक डी. मंगनाळे आणि व्यंकट लक्ष्मण पवार यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मान्टे करित आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT