aurangabad gramin accident news
aurangabad gramin accident news 
मराठवाडा

...म्हणून जखमी मजुरांना औरंगाबादला पाठवले (Video)

शेख मुनाफ

आडुळ (जि. औरंगाबाद) : प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणलेल्या अपघातग्रस्त गंभीर जखमी मजुरांना तपासण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच काय,तर एकही कर्मचारी हजर नव्हता. आडूळच्या आरोग्य केंद्रात अर्धा तास यातना सहन करणाऱ्या या मजुरांना अखेर खाजगी वाहनातून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. 

त्याचं झालं असं... 

आडूळहून पैठणकडे मोसंबी तोडण्यासाठी मजूर घेऊन जात असलेल्या टेम्पोचे स्टेअरिंग लॉक झाले आणि टेम्पो उलटला. या टेम्पोमधील 10 मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 1) सकाळी आठ वाजेच्या सुमारास आडुळ (ता.पैठण) शिवारातील शिवगड तांड्याजवळ घडली. 

अपघातानंतर जखमी मजुरांना आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता येथे वैद्यकिय अधिकारी सोडाच, एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने जखमींना तब्बल अर्धातास यातना सहन कराव्या लागल्या. यानंतरही कोणी न आल्याने अखेर जखमींना खाजगी वाहनातून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. 

जखमींची नावे 

या टेम्पोत (क्रमांक एम. एच. 20 बी.टी. 4598) एकबाल अकबर शेख (वय 32 वर्षे), अन्वर अकबर शेख (वय 28 वर्षे), अशपाक इसुफ शेख (वय 29 वर्षे), अमजद जब्बार शेख (वय 25 वर्षे), एजाज वजीर पठाण (मारिया) (वय 25 वर्षे), सरवर तैमूर शेख (वय 26 वर्षे, सर्व राहणार आडुळ बु., ता.पैठण), सुरेखा रणजित राठोड (वय 20 वर्षे), स्वाती राजु राठोड (वय 20 वर्षे), पायल कल्याण राठोड (वय 18 वर्षे), राम संजय राठोड (वय 18 वर्षे, सर्व राहणार अब्दुल्लापुर तांडा, ता. पैठण) अशी या जखमी कामगारांची नावे आहेत. 

बाकीचे बालंबाल बचावले 

हे मोसंबी तोड कामगार आडुळहुन पैठण येथील एका मोसंबी बागेतील मोसंबी तोडण्यासाठी जात असतांना शिवगड तांड्यानजीक त्यांना घेऊन जात असलेल्या टेम्पोचे स्टेअरिंग लॉक झाल्याने टेम्पो पल्टी झाला. यात हे सर्व जण जखमी झाले. बाकीचे काही जण मात्र बालंबाल वाचले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कल्याण राठोड, फेरोज बरडे करीत आहे. 

गावकऱ्यांचा संताप 

जखमींना आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ताबडतोब आणले. मात्र येथे कोणीही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याने जखमींना आर्धा तास मरण यातना सहन कराव्या लागल्या. शेवटी ग्रामस्थांनी खाजगी वाहनाने जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. यानंतर आलेल्या वैद्यकीय अधिकारी निलकंठ चव्हाण व येथील कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरुन संताप व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT