Books sakal
मराठवाडा

Publication of Books : लातूरमध्ये आज एकाच वेळी होणार तब्बल १०५१ ग्रंथांचे लोकार्पण!

पुनरुत्थान विद्यापीठाच्या (कर्णावती, गुजरात) भारतीय शिक्षणावर आधारित ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या १०५१ ग्रंथांचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. आठ) येथे होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर - पुनरुत्थान विद्यापीठाच्या (कर्णावती, गुजरात) भारतीय शिक्षणावर आधारित ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या १०५१ ग्रंथांचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. आठ) येथे होणार आहे. दयानंद सभागृहात सायंकाळी साडेसहाला हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था व श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेतर्फे हा कार्यक्रम होत आहे.

गत वीस वर्षांपासून विद्यापीठ शिक्षणाचे संपूर्णपणे भारतीय प्रतिमान प्रतिष्ठित करण्यासाठी काम करत आहे. या काळात विद्यापीठाने अध्ययन, अनुसंधान, ग्रंथ निर्माण, संदर्भ साहित्य निर्माण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. यातून विद्यापीठाने देशभरात ओळख निर्माण केली आहे.

विद्यापीठाची मुख्य शिक्षा संस्था भारतीय शिक्षणाचा आदर्श, परंपरा व आधुनिकता यांचे पुनरुत्थान करणे, तसेच भारतीय शिक्षण व्यवस्था केवळ परीक्षार्थी नाही, तर जीवनविद्या देणारी असावी यासाठी काम करत आहे. याअंतर्गत ज्ञानसागर महाप्रकल्पाद्वारे १६ जुलै २०१९ ला १०५१ ग्रंथांची निर्मिती व प्रकाशन पूर्ण झाले आहे. या ग्रंथांचे राष्ट्रव्यापी लोकार्पण शनिवारी होणार आहे. या सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य सुरेश तथा भैया जोशी यांचे मार्गदर्शन होणार आहे.

पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती इंदुमती काटदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास संघाच्या देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव हेही उपस्थित रहाणात आहेत. उपस्थितीचे आवाहन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह हेमंत वैद्य, केशवराज शैक्षणिक संकूलाचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर, कार्यवाह शैलेश कुलकर्णी व श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने अध्यक्ष, विश्वस्त मंडळ लक्ष्मीनारायण लाहोटी, अध्यक्ष संचालक मंडळ शैलेशकुमार लाहोटी, सचिव ॲड. आशिष बाजपाई, राजा नारायणलाल लाहोटी विद्यालयाचे अध्यक्ष आनंद लाहोटी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT