10th,12th Board Exam  sakal
मराठवाडा

10th,12th Board Exam : प्रात्यक्षिक परीक्षांवरही करडी नजर ; दहावी, बारावीतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना

दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षांनाही मंडळाच्या भरारी पथकांकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षांनाही मंडळाच्या भरारी पथकांकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या तर एक मार्चपासून दहावीच्या परीक्षांना सुरवात होत आहे. लातूर विभागीय मंडळांतर्गत येणाऱ्या लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यांत परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या बारावीची प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा सुरू आहे. लवकरच दहावीचीही प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होईल. लेखी परीक्षेप्रमाणे या परीक्षांनाही भरारी पथकांकडून अचानक भेटी देण्यात येणार आहेत, असे तेलंग यांनी सांगितले.

दहावीसाठी ४०८ केंद्रे

दहावी परीक्षेसाठी ४०८ परीक्षा केंद्रे असून यंदा त्यात नव्या १३ केंद्रांची भर पडली आहे. यात लातूर जिल्ह्यात १५१, धाराशिव - ८९ तर नांदेड जिल्ह्यात १६८ केंद्रे असतील. दहावी परीक्षेसाठी तीन जिल्ह्यांतील मिळून एक लाख सात हजार ५२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची जवळच्या केंद्रावर सोय करण्यात आली आहे.

बारावीसाठी २३८ केंद्रे

बारावीची परीक्षा २३८ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यंदा या केंद्रामध्ये नव्या पंधरा केंद्रांची भर पडली आहे. यात लातूर जिल्ह्यात ९५, धाराशिव ४२ तर नांदेड जिल्ह्यातील १०१ केंद्रांचा समावेश आहे. बारावीसाठी ९६ हजार १७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

सात भरारी पथकांची स्थापना

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने सात भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा दक्षता समितीकडूनही त्या त्या जिल्ह्यात बैठ्या व भरारी पथकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या स्थितीत यंदा प्रात्यक्षिक परीक्षेवरही कडक नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. भरारी पथकांना या परीक्षांनाही भेटी देण्याचे आदेश दिल्याचे तेलंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT