accident 
मराठवाडा

वऱहाडाच्या टेम्पाेला भीषण अपघात; 12 जण ठार

सुनील पौळकर

मुखेड : खराेसा ता. निलंगा (जि. लातूर ) येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन मुखेड येथे येत असलेल्या आयशर टेम्पाेला जांब- शिरूर रस्त्यावर अपघात हाेऊन टेम्पाेमधील 12 जण ठार झाले, तर दाेन अत्यवस्थ असलेल्या नांदेड येथे हलविल्याचे उपजिल्हा रूग्णालयातील अधिकऱ्यांनी सांगितले.

शनिवारी (ता. 12) लग्नाची तारीख असल्याने शेवटच्या दिवशीच्या मुहूर्तासाठी लग्नांची संख्या माेठी हाेती. त्यातच खराेसा ता. निलंगा (जि.लातूर) येथील नारंगे परिवार व मुखेड येथील टिमकेकर परिवाराचे मुखेड येथे लग्न साेहळा आयाेजित केला हाेता. दरम्यान शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास जांब-शिरूर रस्त्यावर आयशर टेम्पाे (एम.एच.36-एफ-3519) व टँकर (एम.एच.04-ईवाय-770) यांच्यात जाेराची धडक झाल्याने बारा जण जागीच ठार झाल्याची घटना असून दाेन जणांचा मुखेड येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.

या अपघातामध्ये जवळपास 20 जण जखमी असून त्यांच्यावर मुखेड येथे उपचार चालु असल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयातून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पाेलिस निरीक्षक संजय चाेबे यांच्यासह पाेलिसांनी तात्काळ धाव घेऊन जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : आसाममध्ये भाजपचं शतक, काँग्रेसचे २१ उमेदवार आघाडीवर

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT