advocate advocate
मराठवाडा

'वकिलांना विमा कवच द्या', उस्मानाबादेत आतापर्यंत १३ वकिलांचा मृत्यू

वकील मंडळींनी कोरोना संसर्गाची दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: शहरातील प्रख्यात वकील ॲड. राजेश अंधारे यांचे अल्पशा आजाराने सोलापूर येथे रविवारी (ता. नऊ) निधन झाले. दरम्यान, विधीज्ञ मंडळातील आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून वकील मंडळींनी कोरोना संसर्गाची दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय विधीज्ञ मंडळातील सदस्यांना विमा कवच देण्याची मागणी केली जात आहे.

कोरोना संसर्गाने (covid 19 infection) मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, सध्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव वाढला आहे. कोरोना संसर्गापासून विधिज्ञ मंडळाचे सदस्यही सुटलेले नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील प्रख्यात वकिलांना कोरोनाची लागन होऊन जीव गमवावा लागला आहे. त्यांना कसलेही सुरक्षा कवच नाही. वकिलांचा थेट संपर्क पक्षकारांशी येतो. अनेक पक्षकार कोरोना पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे विधिज्ञांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण होत असून, अनेकजण दगावले आहेत. यामध्ये अनेकजण ४५ वर्षे वयापेक्षा कमी वयाचे आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १३ वकिलांना कोरोनाची लागण होऊन जीव गमवावा लागला आहे.

विधिज्ञातील सदस्यांचा थेट पक्षकारांशी संबंध येत असल्याने फ्रंटलाइन वर्कर म्हणून त्यांचे लसीकरण करून घ्यावे. अनेक ४५ वर्षे वयोगटाखालील वकिलांना कोरोना संसर्गाने जीव गमवावा लागला आहे. त्यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच द्यावे.

- ॲड. नितीन भोसले, जिल्हा विधीज्ञ मंडळ, उस्मानाबाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT