संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

एसटी महामंडळाची गेवराईत 14 लाखांची लूट, अखेर छडा लागला 

सकाळ वृत्तसेवा

बीड - ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून लूट व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला चढवून 14 लाखांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणांचा तपास करण्यात गेवराई पोलिसांना यश आले. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून एक फरारी असल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सोमवारी (ता. दोन) दिली. 

सागर ऊर्फ दत्ता आनंद बाप्ते (वय 22, रा. चिंतेश्‍वर गल्ली, गेवराई) व गणेश दत्तात्रय गोरे (वय 22, रा. शिवाजीनगर, कोल्हेर रोड, गेवराई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी : दत्तात्रय काशीनाथ काळे (रा. गोढाळा, ता. रेणापूर, जि. लातूर) हे 28 जुलैला रात्री औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीतून ट्रक (केए-01 - एजे- 2193) घेऊन चेन्नईला जात होते. नागझरी शिवारात ते आराम करण्यासाठी एका पेट्रोलपंपावर थांबले असताना चाकूचा धाक दाखवून चालक दत्तात्रय काळे व क्‍लीनर चंद्रकांत रमेश माने (रा. वडझरी, ता. पाटोदा) यांच्याकडून रोख 41 हजार रुपये व पाचशे रुपये किमतीची चांदीची पाच ग्रॅमची अंगठी, चार हजार किमतीचे ब्रासलेट हिसकावून घेतले होते.

याप्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गेवराईचे सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. काळे यांनी तपास करत सागर ऊर्फ दत्ता आनंद बाप्ते व गणेश दत्तात्रय गोरे यांना सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून अंगठी, ब्रासलेट हस्तगत केले आहे. त्यांचा अन्य एक साथीदार फरारी आहे. दरम्यान, याच गुन्हेगारांनी 29 जुलैला एसटी महामंडळाची 13 लाख 82 हजार 245 रुपयांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. महामंडळाचे कर्मचारी प्रदीप नागलगोने हे गेवराई आगारात जमा झालेली ही रोकड असलेली बॅग घेऊन दुचाकीवरून स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये जमा करण्यासाठी जात होते.

शिवसेना कार्यालयाजवळ दुचाकीवरून तीन तरुण कोयत्यासह पाठलाग करत आले. त्यांनी नागलगोने यांच्यावर हल्ला करत बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागलगोने यांनी प्रसंगावधान राखत बॅग घेऊन शिवसेना कार्यालय गाठले. त्यामुळे चोरांचा बॅगलुटीचा डाव फसला होता. हा गुन्हादेखील या दोघांनी अन्य एका साथीदाराच्या मदतीने केल्याची कबुली दिली. सहायक फौजदार एस. आर. ऐटवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. यावेळी बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत, आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, गेवराई ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब बडे, शहर ठाण्याचे निरीक्षक वासुदेव मोरे उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT