14 lakhs worth gold jewelery cash stolen in Udgir latur district marathi cime news  
मराठवाडा

Latur Crime : उदगीरच्या उच्चभ्रू वस्तीत घरफोडी! घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पावणे 14 लाखांची ऐवज लंपास

याबाबत सोमेश्वर राचप्पा घाडे (वय-६८) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज धोतरे

उदगीर, ता. १६ : उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निडेबन रस्त्यावर असलेल्या तुलसीधाम उच्चभ्रू वस्तीमध्ये अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडुन सोन्या, चांंदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण १३ लाख ७५ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील निडेबन रोडवर असलेल्या तुलशीधाम सोसायटीत शुक्रवारी (ता.१४) व शनिवारी (ता.१५) च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सोमेश्वर राचप्पा घाडे व गोपाळ बाबुराव मनदुमले यांचे घरात कोणीही नसलेले पाहुन कुलूप कोंडी तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिने जुने वापरते किंमत अंदाजे ९ लाख ८० हजार सहाशे रुपये व रोख रक्कम ३ लाख ९५ हजार रुपये असा एकूण असा एकूण १३७५६०० रुपयेचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला.

याबाबत सोमेश्वर राचप्पा घाडे (वय-६८) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या परिसरातल्या सीसीटीव्ही पुटेज तपासणी केल्यानंतर तीन अज्ञात चोरट्यांनी हे कृत्य केलं असल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळून आले असून याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहेत.

चोरीमुळे शहरात खळबळ

शहर व ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटनांचे प्रमाण अत्यंत कमी झाले होते. चोरीच्या घटना पुन्हा चालू झाल्याने शहर व परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेज असल्याने या चोरट्यांचा लवकरात लवकर अटक करावी अशी माहणी स्थानिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT