14 new Covid-19 cases in Parabhani district 
मराठवाडा

Covid-19 : परभणी, गंगाखेड, सेलूत आज १४ नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः जिल्ह्यात रविवारी (ता. २४) १४ रुग्णांच्या कोविड-१९ च्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार, गंगाखेडमध्ये अकरा, परभणीत दोन आणि सेलूत एकाला कोविड-१९ ची बाधा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची आता एकूण रुग्णसंख्या ३६ वर पोचली आहे. 

जिंतूर तालुक्यातील सावंगी (भांबळे) येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असताना रविवारी (ता. 24) रात्री कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने 14 वाढ झाली. रविवारी सकाळपासून शासकीय अधिकारी नांदेड येथील प्रयोगशाळेकडून कधी अहवाल प्राप्त होतो, या प्रतीक्षेत होते. रविवारी दिवसभरही अहवाल प्राप्त झाला नाही. रविवारी प्रलंबित स्वॅबची संख्या दोनशेंवर पोचली. या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत दिवसेदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी मध्यरात्री नांदेड येथील प्रयोगशाळेमार्फत प्राप्त अहवालानुसार सावंगी (भांबळे) येथील एक महिला व परभणीतील एका तरूणीचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. परिणामी, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखीन दोनने वाढ झाली. ती संख्या 22 पर्यंत पोचली.

त्यातच सावंगी येथील संशयित महिलेचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला अन् मध्यरात्री ती महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्ह्यातही प्रचंड अस्वस्थता पसरली. विशेषत म्हणजे कोरोनाबाधित सर्व रुग्ण हे परजिल्ह्यातून आपल्या मुळगावी म्हणजे परभणी जिल्ह्यात दाखल झालेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT