file photo 
मराठवाडा

‘या’ साठी नांदेडला सोळा कोटी

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील नऊ तालुक्यात विविध विकासासाठी १५ कोटी ८५ लाखांचा मराठवाडा विकास मंडळाचा विशेष निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. मराठवाडा विकास मंडळाकडून हा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रातंर्गत किनवट, हिमायतनगर, भोकर, बिलोली, धर्माबाद, देगलुर, उमरी, मुदखेड व लोहा या तालुक्यात यातून विकास कामे होणार आहेत.

किनवट, बिलोली, मुदखेड व लोहा तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात स्वास्थ्य ग्राम पथदर्शी प्रकल्पा यंत्र, स्वास्थ सहाय्यक मशीनसाठी एक कोटी ४४ लाख रुपये. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करिता एक फेको मशीन व एक नेत्र शस्त्रक्रिया मायक्रोस्कोप मशीन उपलब्ध करून देण्यासाठी किनवट व नांदेडसाठी चाळीस लाख रुपये. नेत्र रुग्णालय मांडवी (ता. किनवट) यंत्रसामग्री व आधुनिक साहित्यासाठी तीस लाख रुपये.

तालुकानिहाय निधी 
जिल्हा परिषदेतील उच्च प्राथमिक शाळा नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रासाठी भोकर, उमरी व लोहा तालुक्यासाठी ८० लाख रुपये, धर्माबाद, हिमायतनगर, भोकर, बिलोली, मुदखेड व लोहा या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत प्रयोग शाळा साहित्यासाठी ९९ लाख रुपये. पाने व उती तपासणी प्रयोगशाळेसाठी वीस लाख रुपये, नऊ तालुक्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहीका खरेदीसाठी एक कोटी २६ लाख रुपये, महिला आर्थीक विकास महामंडळाच्या देगलूरच्या बचत गटासाठी शेती मालवाहतूक कूलिंग व्हॅनसाठी १३ लाख पन्नास हजार रुपये.

महिला बचत गटांना संधी 
हिमायतनगर तालुक्यातील खवा सेंटर साहित्य सामग्रीसाठी सहा लाख १६ हजार रुपये. धर्माबाद येथील माविम महिला बचत गटासाठी मसाला युनिट उभारणीसाठी १४ लाख २१ हजार रुपये, माविम महिला बचत गट टेलरिंग युनिट सीएफसी सेंटरसाठी २५ लाख रुपये, देगलूर, नऊ तालुक्यातील महिला बचत गटांसाठी स्पायरल सेपरेटरसाठी २५ लाख २० हजार रुपये, किनवट, उमरी, बिलोली, मुदखेड व लोहा तालुक्याती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये डिजिटल वर्ग शालेय कौशल्य वर्धनसाठी सहा कोटी ८० लाख रुपये.

शाळेतील ग्रंथालय पुस्तकांनी भरणार
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये ग्रंथालयास पुस्तके पुरवण्यासाठी ३२ लाख वीस लाख रुपये असा १५ कोटी ८५ लाख रुपये निधी लवकरच प्राप्त होणार असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास कार्यक्रम) सुरेश थोरात यांनी कळवले आहे.

शेतकरी गट, उत्पादक संस्थेसाठी निधी
शेतकरी गट, उत्पादक संस्थेस सरकी तेल, दालमिल, आटा मिल, जिनिंग युनिट, सोयाबीन प्रक्रिया, मका तेल, लिंबू चटणी मेकिंग, मोसंबी किंवा डाळिंब ज्यूस, शेंगदाणा चिक्की, कांदा प्रक्रिया, मसाले मेकिंग तसेच कृषी पशुसंवर्धन कुटीर उद्योग आदी पैकी स्थानिकस्तरावर कच्चामाल उपलब्ध असणाऱ्या किमान एका उद्योगाची निर्मितीसाठी अर्थसाह्यासाठी एक कोटी ८० लाख मंजूर झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT