file photo 
मराठवाडा

परभणीत तब्बल १८८ कोरोना संशयित !  

कैलास चव्हाण

परभणी : परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संशयित म्हणून तब्बल १८८ जणांची नोंद झाली असून त्यापैकी १०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी (ता. एक) दाखल संशयितांपैकी १८ जणांचे स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून गुरुवारी (ता. दोन) आरोग्य विभागातील तब्बल ८० पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

जगभर कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परभणीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या नेतृवाखाली प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. शहरासह ग्रामीण भागात घरोघरी तपासणी सुरू करण्यात आली आहे. बाहेरगावांहून आलेल्या नागरिकांची कसून तपासणी केली जात असून जे बाहेरगावांहून आले आहेत, अशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत परभणी जिल्ह्यात १८८ संशयितांची नोंद झाली आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात सध्या ३१ जणांची रवानगी करण्यात आली आहे, तर ११७ जणांचे घरी विलगीकरण करण्यात आले आहे. तर ४० संशयितांनी विलगीकरणाचा कालवाधी पूर्ण केला आहे.

परदेशातून आलेले ६१ जण
१८८ संशयितांमध्ये परदेशातून आलेले ६१ जण असून त्यांच्या संपर्कात आलेले सहा लोक आहेत. या सर्वांना प्रशासनाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण १३८ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले असता त्यापैकी १०१ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत, तर २२ स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. १५ स्वॅबची तपासणीची गरज नसल्याचा निर्वाळा राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिला आहे.

बुधवारी पाठविले १८ स्वॅब
दररोज संशयितांमध्ये वाढ होत असून बुधवारी नव्याने १८ लोक संशयित म्हणून रुग्णालयात दाखल झाले आहेत.
या सर्वांचे स्वॅब पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.


८० पदांसाठी थेट मुलाखती
आरोग्य विभागात कर्मचारी, अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. तसेच भविष्यातील वाढता धोका लक्षात प्रशासनाने मोठी तयारी सुरू केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी अंतर्गत संस्थेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ४० वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ व ४० अधिपरिचारिकांची पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी गुरुवारी (ता. दोन) जिल्हाधिकारी कार्यालयात थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

Baramati News : बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी? 16 जानेवारीला होणार निवड

SCROLL FOR NEXT